Hurun’s Top Philanthropist List: Zerodha चे सह-संस्थापक नितीन आणि निखिल कामथ यांनी दान केले 110 कोटी रुपये
त्यांच्याकडे एकूण 17,500 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
Hurun’s Top Philanthropist List: झेरोधाचे सह-संस्थापक नितीन आणि निखिल कामथ (Nikhil Kamath) यांनी हवामान बदल आणि पर्यावरणीय शाश्वततेशी निगडीत NGO ला 110 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या देणगीनंतर त्याचे नाव हुरुनच्या टॉप फिलान्थ्रोपिस्ट लिस्ट 2023 मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या देणगीनंतर निखिल कामथ हा सर्वात तरुण समाजसेवी बनला आहे. या यादीत एचसीएल एंटरप्राइझचे चेअरपर्सन शिव नाडर आणि त्यांचे कुटुंब शीर्षस्थानी आहे. त्यांनी 2,042 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तर नितीन आणि निखिल कामथ यांनी 12 वा क्रमांक पटकावला आहे.
गेल्या वर्षी, निखिल कामतचे नाव 'हुरुन इंडिया 40 आणि अंडर सेल्फ मेड रिच लिस्ट 2022' मध्ये समाविष्ट करण्यात आले होते. त्यांच्याकडे एकूण 17,500 कोटी रुपयांची संपत्ती आहे. याशिवाय ते या वर्षी 'द गिव्हिंग प्लेज'साठी भारतातील सर्वात तरुण प्रतिज्ञा करणारा ठरला. द गिव्हिंग प्लेजची स्थापना बिल गेट्स आणि वॉरेन बफे यांनी केली होती. अझीम प्रेमजी, किरण मुझुमदार-शॉ, रोहिणी आणि नंदन नीलेकणी यांच्यानंतर शपथ घेणारे ते चौथे भारतीय आहेत. (हेही वाचा - NewsClick चे संस्थापक Prabir Purkayastha यांच्या अडचणी वाढल्या; 1 डिसेंबरपर्यंत तुरुंगात रवानगी)
गिव्हिंग प्लेजमध्ये तुम्हाला तुमच्या संपत्तीचा मोठा हिस्सा धर्मादाय कारणांसाठी देणे आवश्यक आहे. एक तरुण परोपकारी म्हणून गिव्हिंग प्लेजमध्ये सामील झाल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, असं झेरोधा सह-संस्थापकांनी त्यांच्या प्रतिज्ञा पत्रात म्हटले आहे. मी जगावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी आणि अधिक न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी फाउंडेशनच्या मूल्यांशी आणि आकांक्षांशी संरेखित आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे.