Theft: एक्स गर्लफ्रेंडशी बदला घेण्यासाठी तरुणाने महाविद्यालयाच्या वसतिगृहातून चोरला लॅपटॉप

चेन्नई शहर पोलिसांनी (Chennai Police) वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहातून (College Hostel) लॅपटॉप चोरल्याच्या (Laptop theft) आरोपाखाली 25 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.

प्रतिकात्मक फोटो ( Photo Credit: Pixabay )

चेन्नई शहर पोलिसांनी (Chennai Police) वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहातून (College Hostel) लॅपटॉप चोरल्याच्या (Laptop theft) आरोपाखाली 25 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. त्याने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडशी बदला घेण्यासाठी असे केले आहे. H1 वॉशरमनपेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टॅनले मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील मेडिकलच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या रुथ्रेशकडून 8 एप्रिल रोजी त्यांना तक्रार मिळाली होती की, त्याचा लॅपटॉप त्याच्या वसतिगृहाच्या खोलीतून चोरीला गेला आहे. अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवला. वसतिगृहाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही व्हिज्युअल तपासले. इतर पुरावे गोळा केले.

व्हिज्युअल्सचे विश्लेषण करताना, पोलिसांना तो वसतिगृहातून बॅग घेऊन ऑटोरिक्षामध्ये चढताना आढळला. पोलिसांनी रिक्षाचा माग काढून आरोपीला शनिवारी सेमेनचेरी येथून अटक केली. पोलिसांनी सांगितले की, तमिळ सेल्वन नावाच्या आरोपीने 31 उच्च दर्जाचे लॅपटॉप चोरले आहेत आणि ते काळ्या बाजारात विकून तो आपली उपजीविका करत आहे. बनावट ओळखपत्रे बाळगून, तमिळ सेल्वनने केरळ, दिल्ली आणि गुजरातसह देशातील इतर वैद्यकीय महाविद्यालयांच्या वसतिगृहांमध्ये अशाच प्रकारची कृत्ये केली, असे पोलिसांनी सांगितले. हेही वाचा  Mumbai: पत्नीचा लैंगिक छळ करण्यासाठी पतीने तयार केल्या 11 बनावट इंस्टाग्राम प्रोफाइल्स; FIR दाखल

वाशरमनपेट पोलिस स्टेशनचे निरीक्षक एस यमुना यांनी सांगितले की, आरोपीवर आयपीसीच्या कलम 380 (चोरी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तमिळ सेल्वन म्हणतो की त्याच्या मैत्रिणीने त्याच्याशी संबंध तोडल्यानंतर त्याने मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहांमधून लॅपटॉप चोरण्यास सुरुवात केली. परंतु आमचा विश्वास आहे की हे एकमेव कारण असू शकत नाही. त्याच्यावर खटले प्रलंबित होते, त्याला लहानपणापासूनच चोरीची सवय होती. दोन्ही पालक गमावल्यामुळे, तो लहानपणापासूनच भरकटला होता, इन्स्पेक्टर पुढे म्हणाले.