World’s Costliest Mango: ओडिशाचा शेतकरी बनला जगातील सर्वात महाग आंबा पिकवून श्रीमंत, किंमत ऐकून बसेल धक्का
आंब्याची जातीनुसार किंमत बदलते. दुसरीकडे, ओडिशाच्या बरगड जिल्ह्यातील पदमपूर भागात एक शेतकरीने त्याचा बागेत खास जातीचा आंबा पिकवला आहे, जाणून घ्या अधिक माहिती
World’s Costliest Mango: आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे आणि साधारणपणे देशभरात 1,200 पेक्षा जास्त जातींचे आंब्याचे उत्पादन घेतले जाते. आंब्याची जातीनुसार किंमत बदलते. दुसरीकडे, ओडिशाच्या बरगड जिल्ह्यातील पदमपूर भागात एक शेतकरीने त्याचा बागेत खास जातीचा आंबा पिकवला आहे, ज्याची किंमत प्रति किलो 2 लाख रुपये आहे. जगातील सर्वात महागड्या आंब्याला मियाझाकी आंबा म्हणतात, ज्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी तसेच अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. चंद्राबाबू सत्यनारायण, ओडिशाच्या पॅकमल ब्लॉकमधील नीलाधर गावचे शेतकरी, त्यांच्या शेतात जगातील सर्वात महागड्या मियाझाकी जातीसह विविध प्रजातींचे आंबे पिकवत आहेत.
जाणून घ्या अधिक माहिती
त्यांनी पिकवलेले आंबे मुळात जपानी जातीचे आणि आइसबॉक्स व्हरायटीचे आहे, ज्याला परदेशात प्रचंड मागणी आहे. या जातीचे रंगीबेरंगी आंबे दिसायला आकर्षक तर आहेतच, पण त्याची चवही अनोखी आहे. हे फळ त्याच्या अनोख्या चवीसाठी ओळखले जाते आणि आंब्याच्या इतर जातींपेक्षा वेगळे आहे. चंद्राबाबू वर्षानुवर्षे भातशेती करत होते, परंतु त्यांना फारसे यश मिळाले नाही. चंद्राबाबू यांचा मुलगा साईबाबूही त्यांना शेतीत मदत करत आहे.