Woman Swept In River: भद्राद्री कोठागुडेम येथे पूरग्रस्त भाग ओलांडताना महिला वाहून गेली, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा (Watch Video)
काही ठिकाणी आज अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान एक महिला नदीच्या पूरात वाहून गेली आहे.
Woman Swept In River: तेलंगणामध्ये (Telangana) संततधार पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसाने ठिकठिकाणी विचित्र अपघात घडून येत आहे. दरम्यान भद्राद्री कोठागुडेम येथे पूरग्रस्त (Flood) भाग ओलांडताना एक महिला वाहून गेली. ती वाहून जात असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. ती अद्याप बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. घटनास्थळावरील एका व्हिडिओमध्ये महिलांचा एक गट खळखळणाऱ्या पाणीतून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, दरम्यान एका महिलेला जोरदार प्रवाहाने ओढून नेले होते. अर्लट अलार्म वाजताच तिला वाचवण्यासाठी काही लोक खाली नदीवर धावले. स्थानिकांनी तीला मदतीचा हात दिला असताना तीला वाचवण्यास अपयश आले आहे. बचावकार्य मदतीला धावून आले आहे.
हवामान विभागाने 25 ते 27 जुलै दरम्यान तेलंगणासाठी रेड अलर्ट जारी केला होता आणि राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, आता आणखी दोन दिवस पाऊसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले. निजामाबादमध्ये आठ तासांत विक्रमी 46 सेंटीमीटर पाऊस झाला असून अजूनही पाऊस सुरू आहे. गोदावरी नदीची पाणीपातळी आज रात्री 8 वाजता 47.3 फुटांवर असून, आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भद्राचलम येथे नदी 48.1 फूट वेगाने वाहत आहे. राज्य सरकारने सर्व शैक्षणिक संस्थांना बुधवार आणि गुरुवारी सुट्टी जाहीर केली होती. मुसळधार पावसाने कहर घातला आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्तक राहण्याचा आदेश दिला आहे.
किमान 42 पर्यटक तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील एका खोल जंगलात अडकून पडले आहेत, जेथे ते राज्यातील सर्वात उंच धबधबा मुथ्यालधार पाहण्यासाठी गेले होते. परतीचा प्रवसा करताना, पाण्याची पातळी वाढल्याने आणि रस्ता शोधणे कठीण झाल्यामुळे गिर्यारोहकांना पायी जाणे अशक्य झाले होते. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांसह बचाव पथके त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मंत्री सत्यवती राठोड यांनी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर कोणतीही कसर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. बचावकार्यात मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलालाही पाचारण करण्यात येत आहे.