Woman poisons Boyfriend: 252 कोटींसाठी बॉयफ्रेंडवरचा खून; नंतर आली गर्लफ्रेंडवर पश्चातापाची वेळ; नेमकं प्रकरण काय?

Representational Image (File Photo)

Woman poisons Boyfriend For 252 Crore: पैशांच्या हव्यासाने अनेकांनी जीव गमावल्याचे समोर आले आहे. पतीच्या संपत्तीसाठी पत्नी पतीची हत्या करते. बहिण भावाची हत्या करते. मुले वडिलांची हतया करतात. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. प्रेयसीने प्रियकराची विष प्रयोग करून (Poison)हत्या केली आहे. लहान मोठ्ठी रक्कम नव्हे तर तब्बल 252 कोटींसाठी तिने(Woman poisons Boyfriend) हे केलं आहे. हा धक्कादायक प्रकार अमेरिकेतील नॉर्थ डकोटा येथे घडलाय. बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्ती आपल्या नावावर होईल या हेतुने तिने दहा वर्षे ज्याच्यावर प्रेम केलं त्याचीच हत्या केली.

पण हत्या केल्यानंतर तिला वस्तुस्थिती समजली अन् पश्चाताप करण्याव्यतिरिक्त तिच्या हाती काही उरलं नाही. आता तिला 25 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इना थिया केनेअर या 48 वर्षीय महिलेने 51 वर्षीय स्टिव्ह रिले यांची हत्या केली. स्टिव्ह रिले यांचा 5 सप्टेंबर 2023रोजी मृत्यू झाला. त्यांच्या चहामध्ये विष टाकण्यात आलं होतं. (हेही वाचा:Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये 11वा आरोपी अटकेत; 29 वर्षीय Amit Hisamsing Kumar ला अटक )

स्टिव्ह रिले यांना मिळालेले 252 कोटी तो वारसाहक्काने देऊन टाकणार आहे असं इनाला कळलं होतं. परंतु, त्याला 252कोटी रुपये मिळणार आहेत हे वृत्तच खोटं निघालं. 252 कोटी रुपये मिळणार असल्याचा मेल रिले यांना आला होता. परंतु, हा मेलच खोटा होता. या खोट्या मेलवर तिने विश्वास ठेवून स्टिव्ह रिले यांची हत्या केली. गेल्या दहा वर्षांपासून रिले आणि इना नातेसंबंधात होते. ज्यादिवशी इनाने रिलेची हत्या केली त्यादिवशी ती सातत्याने वकिलाच्या संपर्कात होती.

चहातून विष मिसळून दिल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तिने मुद्दाम त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं. उशिरापर्यंत तिने त्याच्यावर कोणतेही उपचार केले नाहीत. शेवटी त्याचा मृत्यू झाला. परंतु, स्टिव्ह रिले यांच्या मित्रांनी इनाविरोधात साक्ष दिली. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लागला. शवविच्छेदन अहवालातून त्याच्यावर विषप्रयोग झाल्याचं समोर आलं. त्यामुळे रिलेच्या कुटुंबियांनी इनाविरोधात संताप व्यक्त केला.

कोर्टातच रिलेच्या बहिणीने इनाला सुनावलं. “एखाद्याला आपल्यापासून दूर नेणं तुझ्यासाठी सोपं असेल, पण हे दुःखदायक आहे”, असं रिलेची बहीण म्हणाली. तर रिलेच्या मुलानेही केनेयरला स्वार्थी असल्याचं म्हटलं. दरम्यान, याप्रकरणी इनाला आता 25 वर्षांची शिक्षा झाली असून तिला 2 लाख 90 हजारांचा दंड ठोठावला आहे. हा निधी रिलेच्या कुटुंबियांना देण्यास सांगितलं आहे.