Ranchi: रांची येथे महिलेने दिला 5 मुलांना जन्म; आई आणि मूल निरोगी

सर्व नवजात बालकांचे वजन सुमारे एक किलो आहे. या बालकांना नवजात वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. येथे त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे.

Woman gave birth to 5 children (PC - Twitter/@ranchi_rims)

Ranchi: सोमवारी झारखंडमधील रिम्स (RIMS) रुग्णालयामध्ये एका गर्भवती महिलेने पाच मुलांना जन्म दिला. त्यानंतर संपूर्ण रुग्णालयात हा चर्चेचा विषय ठरला. चतरा जिल्ह्यातील इटखोरी येथील मलकपूर गावात राहणाऱ्या अनिता कुमारी यांनी एकाच वेळी पाच मुलांना जन्म दिला आहे. सर्व नवजात बालकांचे वजन सुमारे एक किलो आहे. या बालकांना नवजात वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. येथे त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे.

डॉक्टरांनी सांगितले की, बाळांचे वजन कमी आहे. हे बालकं प्री-मॅच्युअर आहे. त्यांचा जन्म 26-27 आठवड्यातच झाला आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेतली जात आहे. मुलांच्या आईची प्रकृती ठीक आहे. (हेही वाचा - Center's Action on Indian Cough Syrup: भारतीय कफ सिरपवर केंद्राची कारवाई, सरकारी लॅबमध्ये चाचणी केल्यानंतरच होणार निर्यात; 1 जूनपासून नवीन नियम लागू)

RIMS रांचीने आपल्या ट्विटर हँडलवर सांगितलं की, चतर येथील एका महिलेने RIMS मधील प्रसूती आणि स्त्रीरोग विभागात पाच मुलांना जन्म दिला आहे. बाळांना NICU मध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. डॉ शशी बाला सिंह यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी प्रसूती करण्यात आली.

नवजात बालकांचे वजन कमी असून त्यांना सध्या एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांचे एक पथक आई आणि बाळांवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, रांची रिम्समधून उडी मारून एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमीही समोर आली आहे. रुग्ण लक्ष्मण राम हे तिसऱ्या मजल्यावर असलेल्या वॉर्डात दाखल होते आणि त्याच वॉर्डातील खिडकीतून त्याने उडी मारली. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif