मध्य प्रदेशात विजेच्या झटका लागून तब्बल 20 गायींचा मृत्यू; दोषींवर कारवाई केली जाणार- मुख्यमंत्री कमलनाथ
चरण्याकरिता आलेल्या २० गायींना विजेच्या झटका लागून त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सागर जिल्ह्यातील कडता गावामध्ये घडली आहे. या गायींच्या मालकाला अर्थिक मदत देण्याचे आदेश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ (Kamalnath) यांनी दिला आहे.
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सागर जिल्ह्यात (Sagar) धक्कादायक प्रकार घडला आहे. चरण्याकरिता आलेल्या २० गायींना विजेच्या झटका लागून त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सागर जिल्ह्यातील कडता गावामध्ये घडली आहे. या गायींच्या मालकाला अर्थिक मदत देण्याचे आदेश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ (Kamalnath) यांनी दिले आहेत.
एकाच वेळी २० गायींचा मृत्यू झाल्याने मालकावर दुखाचे डोंगर कोसळले आहे. मध्यप्रदेशात पडत असलेल्या मुसळधार पावसाने विजेची तार जमिनीवर पडली होती. यावेळी तेथे चरण्याकरिता आलेल्या २० गायींचा विजेचा झटका लागल्यामुळे त्यातील २० गायींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जनवरांपासून शेतीचे नुकसान होऊ नये, यासाठीही काही शेतकरी शेतीच्या कडेला विजेची तार लावतात, असा गैरप्रकार आढळून आल्यास, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे कमलनाथ म्हणाले आहेत. हे देखील वाचा-पाटणा: एकाच व्यक्तीला मिळाल्या 3 सरकारी नोक-या, 30 वर्षांपासून घेत होता 3 पगार
काय म्हणाले कमलनाथ?
सागर जिल्ह्यातील कडता गावात विजेचा झटका लागून २० गायींचा मृत्यू झाला आहे. याबदल दुख व्यक्त करतो. नियमानुसार, मृत गायींच्या मालकाला आर्थिक सरकार्य केले जाईल. तसेच या प्रकरणात कोणाचा हालगर्जीपणा किंवा दोष आढळल्यास त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल.