Tourist Guidelines: जाणून घ्या कोरोनामुळे कोणकोणत्या राज्यांनी पर्यटकांवर लावले आहेत निर्बंध ?
आता यामुळे राज्य सरकारांनी (State Government) त्यांच्या पर्यटनस्थळांना भेटी देण्याच्या नियमात पुन्हा एकदा बदल केले आहेत.
कोरोनाच्या (Corona Virus) तिसर्या लाटेच्या भीतीने अनेक राज्यांमध्ये, विशेषत: डोंगराळ भागात पर्यटकांची (Tourist) प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गोव्यासह (Goa) अनेक राज्यात पर्यटकांची गर्दी प्रशासनासाठी चिंतेचे कारण बनली आहे. यादरम्यान, कोरोना नियम (Corona Restriction) देखील बर्याच ठिकाणी तोडले जात आहे. ज्यामुळे कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर अनेक राज्यांनी त्यांची प्रवासावरील निर्बंध (Tourist Guidelines) सुलभ करण्यास सुरवात केली होती. जेणेकरून त्यांची आर्थिक व्यवस्था पुन्हा एकदा सुरू होईल. मात्र निर्बंध शिथिल झाल्यानंतर अनेक पर्यटनस्थळांवर (Tourist Spot) लोकांची मोठी गर्दी वाढली. आता यामुळे राज्य सरकारांनी (State Government) त्यांच्या पर्यटनस्थळांना भेटी देण्याच्या नियमात पुन्हा एकदा बदल केले आहेत.
जर आपणसुद्धा प्रवासाची योजना आखत असाल. तर त्यापूर्वी आपण देशातील वेगवेगळ्या राज्यात प्रवास करण्याचे नियम काय आहेत हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. देशातील कोणत्या राज्यात किती प्रमाणात निर्बंध तेथील सरकारने लावले आहेत. याची माहिती तुमच्यासाठी आम्ही देत आहोत.
1. गोवा
मुंबई उच्च न्यायालयाने १२ जुलै रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की अशा स्थानिक नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांना गोव्यात येण्यासाठी कोरोनाचा नकारात्मक अहवाल पाहण्याची गरज भासणार नाही. मात्र हा आदेश गोवा सरकारला मान्य नाही. जरी येथे येणाऱ्या पर्यटकांना दोन्ही डोस मिळाला असला तरी कोरोनाचा नकारात्मक अहवाल त्यांच्याबरोबर आणणे त्यांच्यासाठी बंधनकारक असेल. मात्र असे असले तरी स्थानिक आणि पर्यटक यातील फरक कसा ओळखणार याचे स्पष्टीकरण अजून सरकारने दिले नाही.
2. नंदी हिल्स, बंगळूर
प्रसिद्ध पर्यटनस्थळ नंदी हिल्समध्ये शनिवार आणि रविवार येण्यास कर्नाटक सरकारने पर्यटकांवर बंदी घातली आहे. 11 जुलै रोजी 8,000 हून अधिक पर्यटक बंगळुरूपासून 60 कि.मी. अंतरावर असलेल्या नंदी टेकड्यांमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर प्रशासनाने येथे ही बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या चिक्काबल्लापूर जिल्हा प्रशासनाने 12 जुलै रोजी दिलेल्या आदेशानुसार शुक्रवारी संध्याकाळी 6 ते सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत नंदी डोंगरावर पर्यटकांच्या आगमनावर बंदी असेल असे म्हटले होते.
3. लडाख
जर आपण लडाखला जाण्याचा विचार करत असाल तर 96 तासां आधीचा कोरोना नकारात्मक अहवाल देणे बंधनकारक आहे. अन्यथा, आपल्याला येथे कोरोना अनिवार्यपणे चाचणी करावी लागेल.
4. सिक्किम
सिक्कीममध्ये सरकारने 5 जुलै रोजी पर्यटकांच्या आगमनावरील बंदी उठवली. यासह ज्यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. ते राज्यात येऊ शकतात, असेही आदेश देण्यात आले होते. कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या वेळी मार्चपासून पर्यटकांच्या आगमनावर बंदी होती.
6. हिमाचल प्रदेश
हरियाणामध्ये कोरोनाचे नियम जूनच्या मध्यात शिथिल करण्यात आले. त्यानंतर पंजाब, हरियाणा आणि दिल्ली-एनसीआर येथून मोठ्या संख्येने पर्यटक येथे दाखल होऊ लागले आहेत. कोविड चाचणी येथे अनिवार्य नाही. मात्र राज्यातील कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.
7. उत्तराखंड
टाळेबंदी उठविल्यानंतर उत्तराखंड सरकारने पर्यटकांना आरटी-पीसीआर अहवालात शिथिलता दिली होती. परंतु आता गर्दीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक झाले आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार एखाद्या व्यक्तीला उत्तराखंडमध्ये प्रवेश करावयाचा असेल तर 72 तासांच्या आत कोरोना नकारात्मक अहवाल, हॉटेल किंवा गेस्ट हाऊसचा तपशील बुक करणे आणि स्मार्ट सिटी पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे.
8. मेघालय
येथे येणाऱ्या पर्यटकांनीही येण्यापूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व प्रवेश बिंदूंवर कोरोना नकारात्मक अहवाल अनिवार्य आहे. तथापि, ज्यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत त्यांना त्यातून सूट देण्यात आली आहे.
9. पुडुचेरी
पुडुचेरीला भेट देणाऱ्या पर्यटकांना 72 तासात कोरोना नकारात्मक अहवाल आणणे बंधनकारक आहे. जर तुम्ही येथे रस्त्याने येत असाल तर तुम्हाला ई-पास असणे बंधनकारक आहे.