Children Covid Vaccination: लहान मुलांच्या लसीकरणाला नेमकं कधीपासून करणार प्रारंभ? सर्वोच्च न्यायालयाने केंद्रासमोर उपस्थित केला प्रश्न

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या भीतीमुळे मुलांविषयी बरेच चिंतेचे वातावरण आहे. या लाटांच्या परिणामांपासून मुलांना वाचवण्यासाठी लवकरात लवकर त्यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे.

Covid-19 Vaccine | Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

कोरोनाचे(Corona Virus) संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यावर उपाय म्हणून असलेली कोव्हॅक्सिन(vaccine) लसीचे उत्पादन सीरम(Serum) संस्थेने केले आहे. यानंतर भारतात लसीकरणाला मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली आहे. भारतातील प्रत्येक भागात लसीचे डोस पोहचवले गेले असून सगळ्या ठिकाणी लसीकरण सुरू आहे. जेव्हा लसीला मान्यता मिळाली त्यानंतर लसीची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सुरूवातीला लसीकरणाचे वर्गीकरण टप्प्यात करण्यात आले आहे.  प्रथम देशातील जेष्ठ नागरिकांना लस देण्यात आली. त्यानंतर हा टप्पा वाढवत जाऊन सध्या 18 वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरू आहे. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने (High Court) लहान मुलांचे लसीकरण कधी करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या भीतीमुळे मुलांविषयी बरेच चिंतेचे वातावरण आहे.  या लाटांच्या परिणामांपासून मुलांना वाचवण्यासाठी लवकरात लवकर त्यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. या संदर्भात केंद्र सरकारने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी कोविड लसीची क्लिनिकल चाचणी सुरू आहे आणि ती लवकरच पूर्ण होणार आहे. ही चाचणी झाल्यानंतर लहान मुलांचे लसीकरण करता येईल.

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार सरकार लवकरच याबाबत धोरण तयार करेल. तसेच तज्ञांच्या परवानगीने मुलांना लसी दिली जाईल. मुख्य न्यायाधीश डी.एन. पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंह म्हणाले की, चाचणी आधी पूर्ण होऊ द्या, अन्यथा चाचणीशिवाय लसीकरण करणे खुप जोखमीचे ठरेल. चाचणी पूर्ण झाल्यानंतर आपण शक्य तितक्या लवकर मुलांचे लसीकरण करावे. संपूर्ण देश याची वाट पाहत आहे.

याप्रकरणी पुढील सुनावणीसाठी कोर्टाने 6 सप्टेंबरची मुदत दिली आहे. उच्च न्यायालयात एका अल्पवयीन व्यक्तीने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी होत आहे. यामध्ये कोविड-19 ची तीसरी लाट त्यांच्यावर सर्वाधिक परिणाम करेल अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांचे त्वरित लसीकरण करण्याची विनंती करण्यात आली आहे.