Weather Update News: 'या' राज्यात पावसाचे थैमान, पुढील तीन दिवस असं राहिल वातावरण, वाचा हवामान खात्याचा अंदाज
तर काही राज्यात पावसाने दडी मारली आहे. महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील काही ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे.
Weather Update News: देशात काही ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. तर काही राज्यात पावसाने दडी मारली आहे. महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील काही ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे काही ठिकाणी पुर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाली आहे. सखल भागात पाणी साचले आहे. नद्यांना देखील पूर आला आहे. मध्य प्रदेशात मुसळधार पावसानंतर परिस्थिती बिकट झाली. दिल्लीत काही ठिकाणी वातावरणात बदल होत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाली आहे.
मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसानंतर तेथे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्यांना पूर आला आहे. पावसाचे पाणी घरात आणि दुकानात शिरल्याने नागरिकांना अनेक अडचणांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज (17 सप्टेंबर) राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिल्ली राज्यात अधूनमधून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे.वातावरण ढगाळ झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पासून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 19 ते 21 सप्टेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय उत्तराखंड राज्यामध्येही 20 सप्टेंबरपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातही मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज (17 सप्टेंबर) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं राज्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील हलक्या स्वरुपाचा पाऊस आहे. राजस्थानमध्येही गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.