Chirag Paswan Viral Video: वडील रामविलास पासवान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुलगा चिरागने केली रिहर्सल; पहा व्हायरल व्हिडिओ

या व्हिडिओमध्ये चिराग पासवान आपले दिवंगत वडील आणि माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) यांना श्रद्धांजली वाहण्याची रिहर्सल करताना दिसत आहेत. काँग्रेस नेते पंखुड़ी पाठक यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करत चिराग पासवान यांना लक्ष्य केलं आहे.

Chirag Paswan (Photo Credit - Twitter)

Chirag Paswan Viral Video: बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Elections 2020) च्या दरम्यान लोक जनशक्ती पार्टीचे (एलजेपी) अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांचा एक व्हिडिओ लीक झाला आहे. या व्हिडिओमध्ये चिराग पासवान आपले दिवंगत वडील आणि माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) यांना श्रद्धांजली वाहण्याची रिहर्सल करताना दिसत आहेत. काँग्रेस नेते पंखुड़ी पाठक यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करत चिराग पासवान यांना लक्ष्य केलं आहे. पंखुड़ी पाठक यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'दिवंगत वडिलांच्या फोटोसमोर श्रद्धांजली वाहण्याऐवजी चिराग पासवानचे हे नाटक लज्जास्पद आहे. अशा लोकांमुळे राजकारण बदनाम झालं आहे. जनतेने जागरूक होऊन लोकप्रतिनिधींची निवड केली पाहिजे आणि अशा ढोंगी लोकांना राजकारणामधून वगळले पाहिजे. (हेही वाचा - Bihar Assembly Election 2020: मुलींवर नव्हता विश्वास, जन्माला घातली 9-9 मुले; नीतीश कुमार यांची जीभ घसरली, नाव न घेता लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका)

दरम्यान, व्हायरल व्हिडिओमध्ये रामविलास पासवानच्या फोटोसमोर चिराग पासवान उभे आहेत. ज्यामध्ये त्यांनी पांढरी धोती घातली आहे. हा व्हिडिओ 1 मिनिट 22 सेकंदाचा आहे. या व्हिडिओमध्ये चिराग पासवान केस दुरुस्त करताना दिसत आहेत. असं म्हटलं जात आहे की, हा व्हिडिओ चिराग पासवानच्या एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यानचा आहे. ज्यामध्ये चिराग पासवान अभिनय करताना दिसत आहे. वडील रामविलास पासवान यांच्या फोटोसमोर, चिराग एक डायलॉग बोलत आहेत. हा लीक केलेला व्हिडिओ आणि जाहिरातींचा व्हिडिओ पाहिल्यानंतर बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. या लीक झालेल्या व्हिडिओवरून जेडीयूनेही चिरागला लक्ष्य केले आहे. तथापि, त्यांच्या पराभवाचा मोह आता जनतेत दिसून येत असल्याचंही विरोधी पक्षाकडून बोललं जात आहे.

या व्हिडिओमुळे वडिलांच्या मृत्यूपेक्षा चिराग यांना निवडणुकीची चिंता आहे का? निवडणूक जिंकण्यासाठी चिराग पासवान यांनी हे काम केलं आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा लीक व्हिडिओ बिहारमधील पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या अगदी आधी समोर आला आहे.