IPL Auction 2025 Live

Uttar Pradesh Politics: अमेठीत कॉंग्रेस कार्यालयाबाहेर वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप! (Watch Video)

भारतीय जनता पक्ष (BJP) या तोडफोडला जबाबदार आहे असं दावा कॉंग्रेस पक्षानी केला आहे.

Vandalism Of Vehicles Amethi PC TWITTER

Uttar Pradesh Politics:  उत्तर प्रदेशातील अमेठीतील गौरीगंज भागात रविवारी कॉंग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) या तोडफोडला जबाबदार आहे असं दावा कॉंग्रेस पक्षानी केला आहे. तोडफोडीच्या वेळीस पोलिस फक्त बघ्याची भुमिका घेत आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपची उमेदवारी मागे, महाविकास आघाडीला दिलासा)

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाहनांची तोडफोड केल्या दावा करत उत्तर प्रदेश कॉंग्रेसने आपल्या एक्स हॅंडलवर लिहले आहे की, ''पराभवाच्या भीतीने भाजपातील नेते घाबरले असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी अमेठीक कॉंग्रेस जिल्हा कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. घटनास्थळी स्थानिक लोकांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे. या तोडफोडीत अनेक लोक जखमी झाले आहेत. कॉंग्रेस नेत्यांनी या घटनेनंतर नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोसल मीडियावर व्हायरल होत आहे.

"उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये स्मृती इराणी आणि भाजपचे कार्यकर्ते भयभीत झाले आहेत. स्पष्ट पराभव झालेले भाजपचे गुंड अमेठीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर लाठ्या-काठ्या घेऊन आले, त्यांनी तेथे उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. अमेठीतील काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिकांनाही मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत काँग्रेसने एक्स पोस्टमध्ये लिहलं आहे.