Valsad Express Blast: बिहारमधील मुझफ्फरपूर स्टेशनवर वलसाड एक्स्प्रेसला आग, एका आरपीएफ जवानाचा मृत्यू
श्रमिक एक्सप्रेस सोमवारी वलसाडहून आली होती आणि मुझफ्फरपूर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर उभी होती. दरम्यान, काही कारणास्तव एका एसी बोगीला आग लागली. आग विझवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच स्फोट झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली, जाणून घ्या अधिक माहिती
Valsad Express Blast: श्रमिक एक्सप्रेस सोमवारी वलसाडहून आली होती आणि मुझफ्फरपूर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर उभी होती. दरम्यान, काही कारणास्तव एका एसी बोगीला आग लागली. आग विझवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच स्फोट झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. घटनास्थळी पोहोचलेले रेल्वे आयजी अमरेश कुमार यांनी सांगितले की, एफएसएलची टीम पोहोचली असून तपास करत आहे. आग विझवताना आरपीएफ जवानाचा मृत्यू झाला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)