Corona Vaccination: ओमायक्रोन वेरिएंटच्या भीतीने लसीचा आकडा 132 कोटींच्या जवळ, शुक्रवारी 68 लाखांहून अधिक लसीचे डोस पुर्ण
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 68 लाख 63 हजार 955 लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला, त्यानंतर एकूण लसीकरणांची संख्या 131,90,73072 वर गेली आहे.
कोरोनाच्या ओमायक्रोन (Omicron) प्रकाराबाबत निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरण मोहीमही (Corona Vaccination) वेगाने सुरू आहे. खरं तर, कोरोनाच्या ओमायक्रोन प्रकाराने देशात दस्तक दिल्यापासून सरकार अत्यंत सावध आहे आणि लसीकरणाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान, देशातील कोरोना लसीकरणाचा आकडा 132 कोटींच्या जवळ पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 68 लाख 63 हजार 955 लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला, त्यानंतर एकूण लसीकरणांची संख्या 131,90,73072 वर गेली आहे. देशामध्ये लसीकरण मोहीम या वर्षाच्या सुरुवातीला 16 जानेवारी रोजी सुरू करण्यात आली होती, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले होते. त्यानंतर पुढच्या महिन्यात 2 फेब्रुवारीपासून आघाडीच्या कार्यकर्त्यांची लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.
आरोग्य कर्मचार्यांच्या लसीकरणानंतर, कोविड-19 लसीकरणाचा पुढील टप्पा 1 मार्चपासून 60 वर्षांवरील लोकांसाठी आणि 45 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आजारी व्यक्तींसाठी सुरू करण्यात आला. यानंतर 1 एप्रिलपासून देशातील 45 वर्षांवरील सर्व लोकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. त्यानंतर 1 मे पासून, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व प्रौढांना लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली. (हे ही वाचा Corona Vaccination: बिहारमध्ये कोरोना लसीकरणाचा अजब प्रकार उघडकिस, चक्क मरण पावलेल्या महिलेला दिला कोरोना लसीचा दुसरा डोस.)
देशात ओमायक्रोन वेरिएंटच्या प्रकरणांमध्ये वाढ
दुसरीकडे, देशात कोरोनाच्या ओमायक्रोन वेरिएंटच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात आणखी 7 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, ज्यानंतर ओमायक्रोन संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 17 झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत 3, पिंपरी चिंचवड महापालिकेत 4 नवीन रुग्ण आढळले आहेत.
परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे तपासणी निरीक्षण
ओमायक्रोन वाढत्या प्रकरणांदरम्यान, केंद्र सरकारने सांगितले आहे की परदेशात प्रवास केल्यानंतर भारतात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी आणि देखरेख केली जात आहे. राज्यांनीही खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
59 देशांमध्ये ओमायक्रोन प्रकारची प्रकरणे
यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले होते की, भारतात आतापर्यंत ओमायक्रोन वेरिएंटची 25 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. नोंदवलेल्या सर्व प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. आतापर्यंत नोंदवलेल्या सर्व प्रकारांपैकी हे फक्त 0.04 टक्के आहे. ते म्हणाले की 24 नोव्हेंबरपर्यंत दोन देशांमध्ये ओमायक्रोन वेरिएंटचे प्रकार आढळून आले होते. त्याच वेळी, आता हा प्रकार 59 देशांमध्ये दिसला आहे. या 59 देशांमध्ये ओमायक्रोनची एकूण 2,936 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. याशिवाय 78,054 संभाव्य प्रकरणे आढळून आली आहेत. त्याचे जीनोम सिक्वेन्सिंग सुरू आहे.