Uttar Pradesh News: कार क्लिन करताना तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, घटना कॅमेरात कैद

अमरोह येथे कार धुत असताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Amoha Heart Attack

Uttar Pradesh News: पाच वर्षाच्या मुलीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील अमरोह येथे घडली आहे. तसेच अशी एक घटना अमरोह येथे एक तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अमरोह येथे कार धुत असताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना डिडोली पोलिस स्टेशन हद्दीतील झोया गावात घडली. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, हा तरुण सकळी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार धूत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाला अचानक ह्रदयविकाराचा झटका आला आणि जमिनीवर कोसळला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. तरुणाला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा घटनास्थळी कोणीही उपस्थित नव्हते. तो जमिनीवर पडला आणि व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे त्याला आपला जीव गमवावा लागला. या तरुणाच्या बचावासाठी कोणीही न आल्याने तो काही काळ वेदनेने तेथेच पडून होता. ही कार तरुणाची होती तो कार क्लिन करत होता. क्लिक करताना तो गाडी अचानक जमिनीवर कोसळला.

मोबाईलवर कार्टून पाहताना 5 वर्षांच्या मुलीला हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आहे. मुलीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि रुग्णालय डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले.या दोन्ही घटनेमुळे अमरोह शहर हादरलं आहे.