Representational Image (Photo Credits: Pixabay)

हाथरसमधील बलात्काराच्या घटनेवरुन देशात संतापाची लाट उसळली असताना उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या फतेहपूर (Fatehpur) येथे एका पाच वर्षाच्या मुलीचा बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चिंताजनक म्हणजे, एका 13 वर्षाच्या मुलाने हा बलात्कार केला असून याप्रकरणी त्याला स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. सुरुवातीला पीडित आणि आरोपी पक्षाच्या नातेवाईकांनी सलोखासाठी सायंकाळपर्यंत पंचायत सुरू ठेवली होती. परंतु, निर्णय न झाल्याने सायंकाळी उशिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने आजूबाजुचा संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांच्या शेजारी राहतात. शनिवारी पीडित मुलगी आपल्या घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या शेतात एकटी खेळत होती. त्यावेळी आरोपीने तिला खेळण्याच्या बहाण्याने जवळील झुडपात घेऊन गेला. त्यानंतर त्याने पीडिताच्या खाजगी भागात बोट ठेवले. ज्यामुळे पीडित मुलीला अंतर्गत दुखापत झाली. पीडितेस रविवारी अंतर्गत तपासणीसाठी महिला रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात बलात्कार व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील वाचा- Madhya Pradesh: दोन पत्नींसोबतच्या Sex चे Live Streaming करून कमवायचा हजारो रुपये; पोलिसांकडून अटक

आरोपी हा अल्वयीन असून त्याची कृती बलात्काराच्या प्रकारात येते म्हणून त्याच्याविरोधात भारतीय दंड संहिताच्या कलम 376 (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी किशोर पोलिस व त्याच्या कुटूंबाच्या संयुक्त देखरेखीखाली आहे, कोर्टाकडून आदेश मिळताच त्याला सक्षम अधिकाऱ्यासमोर हजर केले जाईल, अशी माहिती मिळत आहे.