US Civil Nuclear Partnership With India: भारतासोबत नागरी आण्विक भागीदारी करण्याबाबत अमेरिकेची मोठी घोषणा; जेक सुलिव्हन म्हणाले, 'लवकरच कागदपत्रे पूर्ण केली जातील'
भारत-अमेरिका नागरी आण्विक सहकार्यातील अडथळे दूर करण्यासाठी अमेरिका आवश्यक पावले उचलत असल्याचे यूएस एनएसएने म्हटले आहे. सुलिव्हन म्हणाले की, गेल्या चार वर्षांत अमेरिका-भारत संबंध सहकार्याच्या एका नवीन स्तरावर पोहोचले आहेत. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील शांतता आणि स्थिरतेसाठी भारत-अमेरिका सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.
US Civil Nuclear Partnership With India: अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन (US National Security Advisor Jake Sullivan) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान सुलिव्हन यांनी आयआयटी-दिल्ली येथे आपल्या भाषणात सांगितले की, अमेरिका भारतासोबतचे संबंध (US-India Relations) सतत दृढ करत आहे. भारत-अमेरिका नागरी आण्विक सहकार्यातील अडथळे दूर करण्यासाठी अमेरिका आवश्यक पावले उचलत असल्याचे यूएस एनएसएने म्हटले आहे. सुलिव्हन म्हणाले की, गेल्या चार वर्षांत अमेरिका-भारत संबंध सहकार्याच्या एका नवीन स्तरावर पोहोचले आहेत. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील शांतता आणि स्थिरतेसाठी भारत-अमेरिका सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.
जेक सुलिवन यांनी घेतली जयशंकर यांची भेट -
दरम्यान, यापूर्वी सोमवारी जेक सुलिवन यांनी नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. यादरम्यान दोघांनी द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक सहकार्य वाढविण्यावर चर्चा केली. भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनीही या भेटीचे फोटोज त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली आहेत आणि भेटीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. (हेही वाचा -Justin Trudeau Likely to Resign: कॅनडामध्ये होणार मोठी राजकीय उलथापालथ? पंतप्रधान जस्टिन ट्रूडो लवकरच राजीनामा देण्याची शक्यता, पक्षांतर्गत विरोध वाढला)
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची X पोस्ट -
दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढविण्यावर चर्चा -
जयशंकर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, दिल्लीत अमेरिकन एनएसए जेक सुलिवन यांना भेटून आनंद झाला. आम्ही द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक सहकार्य वाढविण्यावर चर्चा केली. गेल्या चार वर्षांत आमच्यात झालेला संवाद वाखाणण्याजोगा आहे. त्यांच्या वैयक्तिक योगदानाबद्दल मी कृतज्ञ आहे, ज्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी आणखी मजबूत झाली.
जेक सुलिवानचा यांचा भारत दौरा महत्त्वाचा -
डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. ट्रम्प यांच्या उद्घाटनापूर्वी जेक सुलिवान यांचा भारत दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. सुलिवान आणि भारताचे राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल, त्यांच्या चर्चेत, ICET च्या अंमलबजावणीवर चर्चा करतील, जो बिडेन यांच्या अध्यक्षतेच्या काळात भारत-अमेरिका सामरिक संबंधांचा विस्तार करण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)