Agra News: पाटणा-कोटा एक्स्प्रेस ट्रेनमध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू, सहा जण आजारी; तपास सुरु
पाटणा-कोटा एक्स्प्रेस ट्रेनमध्ये रविवारी दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आणि सहा जण आजारी पडले.
Agra News: पाटणा-कोटा एक्स्प्रेस ट्रेनमध्ये रविवारी दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आणि सहा जण आजारी पडले. या घटनेमुळे प्रवाशांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत्यू कशामुळे झाला हे अद्यापही समजलू शकले नाही. ते छत्तीसगडमधील रायपूर येथील 90 प्रवाशी एका कोच मध्ये प्रवास करत होते.दरम्यान सहा जण अचानक आजारी पडले. आजारी वाटणाऱ्या सहा जणांपैकी पाच जणांवर आग्रा येथील रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू होते, तर सहाव्याला एस एन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते.
आग्रा विभागातील उत्तर मध्य रेल्वेचे पीआरओ प्रशस्ती श्रीवास्तव यांनी पीटीआयला सांगितले, "रेल्वेच्या हेल्पलाइन नंबरवर प्रवासी आजारी पडल्याचा कॉल आला होता. ते एसी कोचमध्ये प्रवास करत होते. 62 वर्षे वयाची एक महिला आणि 65 वर्षाचा एक पुरूष होता. दरम्यान या दोघांची ही तब्येत बिघडली. आग्रा कॅंट रेल्वे स्थानकावर डॉक्टरांनी त्यांना तपासले. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. ज्या कोच मध्ये बसले होते तेथील पाच प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत." मृत्यूचे कारण अद्याप कळले नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे अन्नातून विषबाधा किंवा डिहायड्रेशनचे प्रकरण आहे असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस अधिकाऱ्यानी मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोस्टमार्टमसाठी मृतदेह पाठवण्यात येणार आहे. रिपोर्ट येई पर्यंत कोणतीही अंदाज लावता येणार नाही. लवकरच रिपोर्ट येईल असं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.