UP Shocker: सरकारी शाळेतील शिक्षकाचा निष्काळजीपणा, पहिलीच्या विद्यार्थीनीला वर्गात कोंडले; शिक्षक निलंबित

सरकारी प्राथमिक शाळेतील एका शिक्षिकेने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनीला शाळेच्या नियमित वेळेनंतर वर्गात कोंडून ठेवल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे.

Girl | Representational image (Photo Credits: pxhere)

UP Shocker:  लखनौमधील (Lucknow) सरकारी प्राथमिक शाळेतील एका शिक्षिकेने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनीला शाळेच्या नियमित वेळेनंतर वर्गात कोंडून ठेवल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे. या घटनेअंतर्गत शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. लखनौमधील मोहनलालगंज ब्लॉकमधील सिसांडी भागातील शाळेत बुधवारी ही घटना घडली. मूलभूत शिक्षा अधिकारी (BSA) अरुण कुमार यांनी सांगितले की, शिक्षिका प्रमिला अवस्थी यांना त्यांचे कर्तव्य न बजावणे, शाळेतील मुलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे यासाठी त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

शिक्षकावर चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. निलंबनाच्या काळात ती विभागीय शिक्षण अधिकारी, मोहनलालगंज, लखनौ यांच्या कार्यालयाशी संलग्न राहील, तर स्वतंत्रपणे आरोपपत्र जारी केले जाईल, असे त्यांनी सांगितले. महक असं विद्यार्थीनीचे नाव आहे. महक वर्गात झोपली होती. तीची दखल न घेता शाळेच्या गेटला कुलूप लावून ते घरी गेले. गणपती विसर्जनसाठी लोकांनी मिरवणूक काढत असताना ढोल वाजल्याने तीला जाग आली, ती खिडकीत येवून आरडाओरड करू लागली. मदतीसाठी तीने हाक मारली.

स्थानिकांना हे लक्षात येताच त्यांनी शाळे कडे धाव घेतला. शिक्षकांना या घटनेची माहिती देताच, कुलुप उघडण्यासाठी शाळेत बोलावून घेतलं. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. शिक्षकांनी निष्काळजीपणा दाखवल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. चिमुकली अर्धा तास बंद खोलीत होती. सरकारी शाळेत अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर येथे दोन दिवसांपुर्वी एका वॉचमनने पहिलीतील एका मुलीला बंद खोलीत कोंडले.