Ghaziabad News: मानसिक छळाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या, बसपाचे आमदारासह पाच जणांवर गुन्हा दाखल
बहुजन समाज पार्टीचे आमदार आणि मुरादनगर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यासह काही लोकांकडून झालेल्या छळाला कंटाळून एका ५० वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Ghaziabad News: बहुजन समाज पार्टीचे आमदार आणि मुरादनगर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यासह काही लोकांकडून झालेल्या छळाला कंटाळून एका 50' वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी त्याने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी व्यक्तीने व्हिडिओ शूट केला आहे.ज्यामध्ये त्याने आरोप केला की, बहूजन समाज पार्टीचे माजी आमदार वहाब चौधरी मुरादनगर नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी अभिषेक कुमार, दोन वकील मुमताज आणि इम्राना आणि धर्मी नावाच्या आणखी एका व्यक्तीकडून त्याचा छळ केला जात आहे. शाहीर हुसेन असं मृत व्यक्तीचे नाव आहे.
गाझियाबादच्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शाहिर हुसेनने शनिवारी सकाळी आत्महत्या केली. हे त्याच्या पत्नीला कळताच तीने खासगी रुग्णालयात नेलं. परंतु उपाचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. शाहिर यांचा दुखाचा डोंगर कोसळला. त्याची पत्नी वासिला हीने पोलीसांत यांच्या विरोधात तक्रार केली. गाझियाबाद पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल झाला. भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
पोलिस आयुक्त अजय कुमार मिश्रा यांनी पीटीआयला सांगितले की, हुसेनच्या पत्नीच्या तक्रारीच्या आधारे, भारतीय दंड संहितेच्या कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले. पोलीस या प्रकरणी कायदेशीर कारवाई करत आहे.