Uttar Pradesh Crime News: जमिनीच्या वादातून 6 जणांची हत्या,दोघांना अटक, देवरिया येथील घटनेमुळे जिल्हा हादरला
एकाच कुटुंबातील सहा जणांपैकी पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपुर्ण जिल्हा हादरला आहे,
Uttar Pradesh Crime News: एकाच कुटुंबातील सहा जणांपैकी पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपुर्ण जिल्हा हादरला आहे, दोन कुटूंबात कडाक्याचे भांडण झाल्याने सोमवारी हा हत्याकांड उघडकीस आला, जमिनीच्या वादावरून दोन कुटूंबांनी गोळीबार केला. ही घटना देवरिया जिल्ह्यातील रुद्रपूर पोलिस स्टेशन अंतर्गत फतेहपूर गावात घडली. जुन्या भांडणातून ही घटना घडली आहे. या हत्याकांड प्रकरणानंतर सीएम योगी यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. या घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विशेष महासंचालक प्रशांत कुमार यांनी माहिती दिली की जमिनीच्या वादावरून दोन कुटुंबांमध्ये सुरू असलेल्या जुन्या वैमनस्यामुळे ही घटना घडली आहे. जिल्हा विकास परिषदेचे (डीडीसी) सदस्य प्रेम यादव हे सत्य प्रकाश दुबे यांच्या निवासस्थानी वाद मिटवण्यासाठी गेले असताना त्यांची हत्या करण्यात आली. ही बाब यादव यांच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना समजताच त्यांनी दुबे यांच्या घरावर हल्ला करून त्यांची हत्या केली. ५४ वर्षीय दुबे यांच्याशिवाय त्यांची पत्नी किरण दुबे आणि १८ वर्षांची मुलगी सलोनी यांचाही मृत्यू झाला.
DDC सदस्य प्रेम यादव यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हल्ला करणाऱ्या जमावाने तिची अल्पवयीन मुलगी नंदिनी आणि मुलगा गांधी यांनाही बेदम मारहाण केली. दुबे यांचा ८ वर्षांचा मुलगा अनमोल यालाही जमावाने क्रूरपणे जखमी केले असून त्याला गंभीर अवस्थेत गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेत १४ जणांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरु करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तसेच दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2023 08:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

