UP Bus Accident: उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येहून बिहारला जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेली बस एका डंपरला धडकली. या अपघातात बस चालकासह चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातात जखमी झालेल्या काहींना गाझीपूर जिल्हा रुग्णालयात तर काहींना उपचारासाठी मऊ येथे पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी पहाटे 5.30 वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात पूर्वांचल द्रुतगती मार्गावरील बरचवार जवळ चॅनल क्रमांक 319 जवळ घडला.
जखमींना तातडीने रुग्णवाहिकेने रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिस अधीक्षक ओमवीर सिंह यांनी सांगितले की, बस चालकाने डंपरला मागून धडक दिली. अपघातात जखमी झालेल्या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. बसमध्ये बसलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, बस चालकाला झोप लागली आणि त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला धडक दिली. त्यांनी सांगितले की, बसमध्ये प्रवास करणारे सर्व लोक बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील रहिवासी होते, जे राम लल्लाचे दर्शन घेऊन अयोध्येहून परतत होते.