UGC NET Exam 2023 TimeTable: UGC NET परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या तारखा
उमेदवार ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन परीक्षेचे वेळापत्रक तपासू शकतात.
UGC NET Exam 2023 TimeTable: UGC NET राष्ट्रीय पात्रता चाचणी (यूजीसी) 2023 परिक्षेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. ही परिक्षा 6 ते 14 डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन होणार आहे. परिक्षेचे सेंटर (Exam Center) यादी परिक्षेच्या दहा दिवस आधी जाहीर करण्यात येणार आहे. एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. उमेदवार ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन परीक्षेचे वेळापत्रक तपासू शकतात.
UGC NET ची यंदाची पहिली परिक्षा ही 6 डिसेंबर रोजी होणार आहे. पहिल्या दिवशी इंग्रजी आणि इतिहासाचे पेपर अनुक्रमे शिफ्ट 1 आणि 2 मध्ये घेतले जातील. दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर 2023 रोजी,वाणिज्य परिक्षा पहिल्या शिफ्टमध्ये घेतले जाईल आणि संगणक विज्ञा आणि एॅप्लिकेशन परिक्षा दुसऱ्या शिफ्टमध्ये घेतली जाईल. तत्वज्ञानाची परिक्षा 8 डिसेंबर रोजी शिप्ट 2 मध्ये घेतली जाईल. राज्यशास्त्राची परित्रा 11 डिसेंबर रोजी शिप्ट 1 मध्ये घेतली जाणार आहे. तर दुसऱ्या सत्रात हिंदीची परिक्षा घेतली जाईल.
परीक्षेचे वेळापत्रक तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. उमेदवारांनी प्रवेशपत्र पोर्टलवर जारी केली जातील,उमेदवार आवश्यक तपशील टाकीन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतील. परीक्षेचे वेळापत्रक PDF स्वरूपात उघडेल.