Chhattisgarh Video: क्षुल्लक कारणावरून दोन तरुणांना बेदम मारहाण, एकाच मृत्यू,1 गंभीर जखमी

दोन तरुणांनी दोन पीडित तरुणांना काठ्यांनी क्रुरपणे हल्ला केला आहे.

VIDEO pc TWITTER

Chhattisgarh Video: छत्तीसगड येथील बिलासपूरमधील भयावह व्हिडिओ समोर आले आहे. दोन तरुणांनी दोन पीडित तरुणांना काठ्यांनी क्रुरपणे हल्ला केला आहे. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या हल्ल्यात पीडितांपैकी एकाला जीव गमवावा लागला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी पोलिसानी संशयित  पाच आरोपीला अटक केले आहे.  ही घटना बुधवारी 14 फेब्रुवारी रोजी घडली आहे. (हेही वाचा- बोरिवलीत राहणाऱ्या महिलेने 11 वर्षीय मुलीची केली हत्या, स्वतः आत्महत्येचा केला प्रयत्न)

मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही भयावह घटना कैद झाली तेव्हा ही घटना उघडकीस आली आहे. दोन तरुण रस्त्यावर पडले होते त्यांच्या अंगावर भरपूर जखमा होत्या, दोन तरुणांनी  पीडित मुलांना धारदार शस्त्राने आणि काठीने मारहाण केली. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आणि एक तरुण गंभीर जखमी झाले आहे. बिलासपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खमतराई हाऊसिंग बोर्ड कॉलनीत सुर्यवंशी यांच्या घरासमोर घडली.

दोघे तरुण पंकज आणि कल्लू मोटारसायकल वरून घरी जात असताना ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी आले. घटनेची चौकशी करण्यात आले. दोघांना रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे. उपचारा दरम्यान पंकजचा मृत्यू झाला.पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. पंकज आणि कल्लू आणि आरोपींचे कशावरून तरी वाद झाले होते त्यामुळे राग अनावर झाल्यानंतर हल्ला करण्यात आला.