IPL Auction 2025 Live

Food Poisoning: ओडिशामध्ये आंब्याच्या बियांपासून बनवलेले लापशी खाल्ल्याने दोघांचा मृत्यू; 6 जणांची प्रकृती चिंताजनक

या सर्व लोकांनी आंब्याच्या बियांपासून बनवलेली लापशी खाल्ली होती. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. यातील एका महिलेचा गुरुवारी तर दुसऱ्या महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला. इतर 6 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Mango Seeds, Death Image प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay, Facebook)

Food Poisoning: ओडिशातील (Odisha) कंधमाल जिल्ह्यात (Kandhamal District) आंब्याचा दलिया खाल्ल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या सर्व लोकांनी आंब्याच्या बियांपासून बनवलेली लापशी (Porridge Made From Mango Seed) खाल्ली होती. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. यातील एका महिलेचा गुरुवारी तर दुसऱ्या महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला. इतर 6 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या सर्वांवर उपचार सुरू आहेत.

आंब्याच्या बियांपासून बनवलेली लापशी खाल्ल्याने दोन महिलांचा मृत्यू -

पोलिसांनी सांगितले की, संपूर्ण प्रकरण दरिंगबाडी ब्लॉकमधील मंडीपंका गावचे आहे. येथे गावात आंब्याच्या बियांपासून बनवलेले लापशी खाल्ल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला. ही लापशी दुधात किंवा पाण्यात उकळून बनवली जाते. गडापूरच्या सरपंच कुमारी मलिक यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री गजपती जिल्ह्यातील मोहना कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये दोन महिलांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका पंचायत सदस्याने सांगितले की, आणखी एक महिला आजारी पडली असून तिला शुक्रवारी सकाळी एमकेसीजी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे तिचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Momo-Linked Food Poisoning in Hyderabad: मोमो खाल्ल्याने महिलेचा मृत्यू, 20 हून अधिक रुग्णालयात दाखल (Watch Video))

सहा जणांवर उपचार सुरू -

दरम्यान, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुब्रत दास यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, दलिया खाल्ल्यानंतर कथितरित्या आजारी पडलेल्या 6 लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व सहा जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे ते आजारी पडल्याचा आम्हाला संशय आहे.