Uttar Pradesh Road Accident: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गोंडा येथे दोन कारची एकमेकांना धडक लागल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले आहे. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. इटियोथोक पोलिस स्टेशन हद्दीतील बेंदूली गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातानंतर एक कार जळून खाक झाली. (हेही वाचा- 'मेंहदी है रचने वाली' स्टेजवर डान्स करत असताना नववधूचा मृत्यू, नैनिताल येथील हृदयद्रावक घटना
मिळालेल्या माहितीनुसार, बेंदूली गावातून जात असताना, एका अनियंत्रित कारची धडक लागल्याने हा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सात जण गंभीर जखमी झाले. अमित कुमार शुक्ला, लक्ष्मी शुक्ला,विनायक शुक्ला, आणि प्रियंका तिवारी एका कारमधून प्रवास करत होते. अमित शुक्ला हे बलरामपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. या अपघातात अमित शुक्ला आणि प्रियंका तिवारी हीचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात एक कार जळून खाक झाली आहे.
दुसऱ्या कारमध्ये पाच जण प्रवास करत होते. ते सर्व जण जखमी झाले. अल्ली मुल्ला (28), अल्ली मुन्निशा (32), हिना खान (14), नाझिया (17) आणि अरमान (8) असं जखमी झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे. ते शवविच्छेदनासाठी पाठण्यात आले आहे. या अपघातानंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.