Trainer Plane Crash in Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील गुना येथील हवाई पट्टीवर ट्रेनर विमान कोसळले; दोन पायलट जखमी
हे विमान काही दिवसांपूर्वी तपासणी आणि देखभालीसाठी येथे आणण्यात आले होते, असंही दिलीप राजोरिया यांनी सांगितलं.
Trainer Plane Crash in Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) गुना जिल्ह्यात (Guna District) एका खासगी विमान अकादमी (Private Aviation Academy) चे प्रशिक्षण विमान (Training Aircraft) रविवारी कोसळले. या दुर्घटनेत दोन पायलट जखमी झाले आहेत. गुना कँट पोलीस स्टेशनचे प्रभारी दिलीप राजोरिया यांनी सांगितलं की, दोन आसनी विमान दुपारी 1.30 च्या सुमारास कोसळले. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने विमान कोसळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अपघात होण्यापूर्वी विमानाने सुमारे 40 मिनिटे उड्डाण केले होते. हे विमान काही दिवसांपूर्वी तपासणी आणि देखभालीसाठी येथे आणण्यात आले होते, असंही दिलीप राजोरिया यांनी सांगितलं. या विमान दुर्घटनेत कॅप्टन व्ही. चंद्र ठाकूर आणि पायलट नागेश कुमार जखमी झाले आहेत. (हेही वाचा -Plane Crashes in Brazil’s Sao Paulo: ब्राझीलच्या साओ पाउलोमध्ये भीषण अपघात; 62 जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले (Watch Video))
पीटीआय ट्विट -
अपघातग्रस्त विमान कर्नाटकातील बेलगावी एव्हिएशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे असून कॅन्ट पोलिसांसह अकादमीचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. दोन्ही पायलट हैदराबादचे रहिवासी आहेत, ज्या संस्थेच्या मालकीचे विमान होते त्याच संस्थेने दोन्ही वैमानिकांना कामावर घेतले होते.
प्राप्त माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त विमान चाचणी आणि देखभालीसाठी शा-शिब अकादमीमध्ये आणण्यात आले. विमान शनिवारीच गुना येथे आले होते. कँट पोलीस स्टेशनचे टीआय दिलीप राजोरिया यांनी सांगितले की, दोन्ही पायलटना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.