IPL Auction 2025 Live

Train Derailment Bids Rise: भारतात रेल्वे अपघातांच्या प्रयत्नांत वाढ; एकट्या ऑगस्टमध्ये 18 घटना, रेल्वेकडून माहिती उघड

ऑगस्टपासून 18 प्रयत्न झाल्याचे रेल्वेने एका अहवालातून म्हटले आहे. यात अधिकाऱ्यांना LPG सिलिंडर, सायकली, लोखंडी रॉड आणि सिमेंट ब्लॉक्ससह रेल्वे रुळांवर ठेवलेल्या विविध प्रकारच्या वस्तू सापडल्या आहेत.

Train | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Train Derailment Bids Rise:  भारतात रेल्वे अपघातांच्या प्रयत्नांत वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय रेल्वेने म्हटले आहे की, ऑगस्टपासून देशभरात रेल्वे गाड्या रुळावरून घसरण्याचे 18 प्रयत्न झाले आहेत. त्यापैकी दोन एकट्या कानपूर आणि अजमेरमध्ये रविवारी नोंदवले गेले आहेत. जून पासून आजपर्यंत अशा 24 घटना घडल्या आहेत. ज्यात अधिकाऱ्यांना LPG सिलिंडर, सायकली, लोखंडी रॉड आणि सिमेंट ब्लॉक्ससह रेल्वे रुळांवर ठेवलेल्या विविध प्रकारच्या वस्तू सापडल्या आहेत.रेल्वेच्या अहवालानुसार, 18 घटनांपैकी 15 घटना ऑगस्टमध्ये आणि तीन घटना सप्टेंबरमध्ये घडल्या. यातील बहुतांश घटना उत्तर प्रदेशमध्ये घडल्या आहेत. (हेही वाचा:कानपूरमध्ये Kalindi Express उलटवण्याचा कट? रेल्वे रुळावर ठेवला LPG Cylinder, सुदैवाने मोठा अपघात टळला )

तर उर्वरित पंजाब, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांमध्ये नोंदवण्यात आल्या आहेत. ऑगस्टमध्ये घडलेल्या एका मोठ्या घटनेत, कानपूरमधील गोविंदपूरी स्थानकाजवळ अहमदाबाद-जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेस पॅसेंजर ट्रेनचे 20 डबे रुळावरून घसरले आणि इंजिन ट्रॅकवर ठेवलेल्या वस्तूला धडकले. या अपघातात सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, रविवारी रेल्वे रुळावरून घसरण्याचे दोन प्रयत्न झाले. कानपूरमध्ये, कालिंदी एक्स्प्रेस पॅसेंजर ट्रेनने ट्रॅकवर ठेवलेल्या एलपीजी सिलेंडरला धडक दिली. लोको पायलटने ट्रॅकवर सिलेंडर, तसेच पेट्रोलची बाटली आणि माचिससह इतर संशयास्पद वस्तू पाहिल्यानंतर रेल्वे ब्रेक लावला. कानपूर पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे, तर आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

रात्री उशिरा, राजस्थानच्या अजमेरमध्ये मालवाहू ट्रेनने प्रत्येकी 70 किलो वजनाच्या दोन सिमेंट ब्लॉकला धडक दिल्याने दुसरी दुर्घटना टळली. ब्लॉकला धडकूनही ट्रेनला कोणताही हानी न होता रेल्वेने प्रवास सुरू ठेवला होता. 4 सप्टेंबर रोजी अशाच एका घटनेत, टॉवर वॅगनच्या लोको पायलटना सोलापूर जिल्ह्यात रेल्वे ट्रॅकवर एक मोठा दगड दिसला, त्यानंतर रेल्वे दगडावर आदळण्यापूर्वीच थांबवली गेली.

या घटनेची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली, त्यानंतर या घटनेचा तपास सुरू करण्यात आला. 2023 मध्ये, जून आणि ऑक्टोबरमध्ये अनुक्रमे ओडिशा आणि राजस्थानमध्ये रुळावरून घसरण्याचे दोन प्रयत्न झाले. ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यात रेल्वे क्रॉसिंगवर लाकूड ठेवण्यात आला होता, तर राजस्थानच्या चित्तोडगडमध्ये ट्रॅकवर एक दगड ठेवण्यात आला होता.