Coronavirus: भारतात गेल्या 24 तासांत 1755 जणांना कोरोनाची लागण, तर 77 जणांचा कोरोनामुळे बळी; देशातील कोरोना बाधितांची संख्या 35365 वर पोहोचली
तर 77 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या देशातील कोरोना बाधितांची संख्या 35365 वर पोहोचली आहे. आतापर्यंत यातील 9064 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 1152 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने माहिती दिली आहे.
Coronavirus: भारतात गेल्या 24 तासांत 1755 जणांना कोरोनाची लागण आहे. तर 77 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या देशातील कोरोना बाधितांची संख्या 35365 वर पोहोचली आहे. आतापर्यंत यातील 9064 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 1152 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने माहिती दिली आहे.
देशात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. देशात महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दरम्यान, आज देशभरात लागू असलेला लॉकडाऊनचा कालावधी 2 आठवड्यांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात सुचना जारी केली आहे. या अधिसुचनेनुसार, राज्यातील तसेच देशातील लॉकडाऊन 17 मे पर्यंत कायम राहणार आहे. (हेही वाचा - Lockdown: लॉकडाऊन कालावधी 2 आठवड्यांनी वाढविण्यात आला, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय)
महाराष्ट्रात मुंबई तसेच पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातील 35 हजारांपैकी 10 हजार रुग्ण केवळ महाराष्ट्र राज्यात आहेत. सध्या राज्यात 10 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. तसेच दिवसेंदिवस या रुग्णांमध्ये वाढ होत आहेत. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा केंद्र सरकारची तसेच राज्यसरकारची डोकेदुखी वाढवत आहेत.