IPL Auction 2025 Live

Tomato Price Hike: टोमॅटोची किंमत लवकरच घसरणार, केंद्र सरकार कडून घोषणा

अशी मंत्रालयाने घोषणा केली आहे. सर्वसामान्य जनतेला परवडेल अश्या किंमती असणार आहे. तर नागरिंकांनी चिंता करु नये असे केंद्राने सांगितले आहे.

Tomato ( Image Credit -Pixabay)

Tomato Price Hike: गेल्या काही आढवड्यांपासून  टोमॅटोचा किंमती  (Tomato Price Hike) दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे सर्व सामान्याच्या  किचनवर चांगला परिणाम झालेला आहे.  140 ते 150 पर्यंत किंमत वाढल्याने काही सर्वसामान्य जनतेच्या खिशावर परिणाम झाला आहे.   टोमॅटोचा दर वाढल्यामुळे घरापासून ते मॅकडोन्ल्डला खरेदी करणं परवडं नाही. दरम्यान ग्राहक संरक्षण मंत्रालयानं (Ministry of Consumer Affairs, Food and Public Distribution) सर्वसामान्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  टोमॅटो 90 रुपये प्रति किलो दरानं विकण्याची घोषणा करण्यात आली आहे.

आता ग्राहक संरक्षण मंत्रालायाच्या अखत्यारित येत असलेल्या नॅशनल कंझ्युमर कोऑपरेटिव्ह फेडरेशननं टोमॅटोच्या दरात कपात केली आहे. आता सरकारी भावानुसार टोमॅटो 90 रुपयांऐवजी 80 रुपयांना मिळतील. टोमॅटोचा भाव नियंत्रणात यावी म्हणून केंद्र सरकारने महत्त्वाचं निर्णय घेतला आहे.

 कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करुन एनसीसीएफ थेट ग्राहकांना टोमॅटोची विक्री करत होती. या टोमॅटोचा दर 90 रुपये प्रति किलो इतका होता. तो आता 10 रुपयांनी कमी करुन 80 रुपये करण्यात आला आहे. देशातील 450 पेक्षा अधिक ठिकाणी सरकार थेट टोमॅटो विकत आहे. टोमॅटोच्या किंमती लवकरच कमी होतील.असे व्यक्त केले आहे.  ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीत टोमॅटोचे उत्पादन कमी होते. शिवाय जुलै महिन्यात पावसामुळे भाजीपाल्याची आयात निर्यात करण्यात अडचणी येतात. त्यामुळे सरकार टोमॅटोच्या भावावर अधिक भर देत आहे.