Maggi Price Hike: झटपट मॅगी बनवण्यासाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे, 70 ग्रॅमच्या पाकिटाच्या किंमतीमध्ये दोन रुपयांनी वाढ

नेस्लेनं मॅगीच्या किंमतीमध्ये नऊ ते 16 टक्क्यांनी वाढ केली आहे. मॅगीच्या नवीन किंमती आजपासून लागू झाल्या आहेत.

Maggi noodles (Photo credit: Website)

लहान मुलांपासुन ते मोठ्या माणसांन पर्यंत सगळे जण मॅगीचे (Maggi) चाहते आहे. पण आता झटपट मॅगी बनवण्यासाठी ग्राहकांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. नेस्ले इंडियाने मॅगीच्या किंमतीत वाढ करण्याच निर्णय घेतला आहे. (Maggi Price Hike) मॅगीच्या 70 ग्रॅमच्या पाकिटाच्या किंमतीमध्ये दोन रुपयांनी वाढ झाली आहे. बारा रुपयांना मिळणारं हे पाकिट आता 14 रुपयांना मिळत आहे. तसंच 140 ग्रॅमच्या पाकिटाच्या किमतीत तीन रुपयांनी वाढ झाली आहे. 560 ग्रॅमच्या पाकिटाच्या किंमतीत 9.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळं 96 रुपयांना मिळणारं 560 ग्रॅमचं मॅगी पाकिट आता 105 रुपयांना मिळणार आहे. नेस्ले आणि एचयूएल यांनी आपल्या प्रॉडक्ट्सच्या किंमती वाढवल्या आहेत. नेस्लेनं मॅगीच्या किंमतीमध्ये नऊ ते 16  टक्क्यांनी वाढ केली आहे. मॅगीच्या नवीन किंमती आजपासून लागू झाल्या आहेत.

नेस्लेने चहा, कॉफी आणि दुधाच्या किंमतीही वाढवल्या आहेत, कंपनीचे म्हणणे आहे. किंमती वाढवल्या गेल्या आहेत. खर्च वाढवण्यासाठी. नेस्ले आणि एचयूएलने त्यांच्या काही उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. (हे ही वाचा Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवासात मिळणार ब्लँकेट आणि चादर; कोरोनामुळे थांबवण्यात आली होती सुविधा)

या वाढीव किंमती सोमवारपासून लागू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच नेस्लेने काॅफीच्या किंमतीतही वाढ केली आहे. नेसकॅफे क्लासिक कॉफी पावडरची किंमत 3 ते 7 टक्के असेल. ब्रूच्या किमतीत 3 ते 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे, याशिवाय ब्रू गोल्ड कॉफी जारच्या किमतीत 3 ते 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.