राहुल गांधी यांच्या विरुद्ध वायनाड येथून निवडणूक लढवलेल्या NDA उमेदवार तुषार वेल्लापल्ली यांना दुबईत अटक

त्यांना भारतीय जनता पक्ष प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA), केरळ ( Kerala) ने उमेदवारी दिली होती. तुषार वेल्लापल्ली यांच्या विरोधात त्यांच्या व्यावसायीक भागिदारने तक्रार दिली होती. त्यानुसार वेल्लापल्ली यांना पोलीसांनी अटक केली.

Thushar Vellappally | (File Photo)

Cheating Case, NDA’s candidate: लोकसभा निडवणूक 2019 मध्ये वायनाड (Wayanad) येथून तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे उमेदवार तुषार वेल्लापल्ली (Thushar Vellappally) यांना दुबई (Dubai) येथे अटक करण्यात आली आहे. तुषार वेल्लापल्ली हे भारत धर्म जन सेना (BDJS) प्रमुख आहेत. त्यांना भारतीय जनता पक्ष प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA), केरळ ( Kerala) ने उमेदवारी दिली होती. तुषार वेल्लापल्ली यांच्या विरोधात त्यांच्या व्यावसायीक भागिदारने तक्रार दिली होती. त्यानुसार वेल्लापल्ली यांना दुबई पोलीसांनी अटक केली.

प्राप्त माहितीनुसार, एनडीए केरळचे उपाध्यक्ष तुषार वेल्लापल्ली यांनी सुमारे दहावर्षांपूर्वी एका निर्माणाधीन असलेल्या एका संस्थेला 10 मिलियन दिरहम (सुमारे 19.5 कोटी रुपये) इतक्या किमतीचा चेक दिला होता. हा चेक बाऊन्स झाला. या प्रकरणात वेल्लापल्ली यांच्या विरोधात त्रिशूर येथील मलयालम उपमहाद्वीप येथे राहणाऱ्या नाजिल अब्दुल्ला यांच्याकडून तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीत वेल्लापल्ली यांच्या मालकीच्या एलएलसी कंपनीसाठी काम केल्याचे म्हटले होते. एलएलसी ही एक बोइंग कंस्ट्रक्शन कंपनी आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका हॉटेलमध्ये आमंत्रीत करण्यात आल्यानंतर बीडीजेएस प्रमुख तुषार वेल्लापल्ली यांना अटक करण्यात आली.

कोण आहेत तुषार वेल्लापल्ली?

तुषार वेल्लापली हे इझावा समूदयाच्या उत्कर्षासाठी काम करणारी संघटना श्री नारायण धर्म परिपल्लना योगमचे महासचिव यांचे चिरंजीव आहेत. इझावा हा समुदाय केरळमधील विकासापासून वंचित असलेल्या समुदायांपैकी एक आहे. या समुह केरळध्ये संख्येने अधिक असल्याचे सांगितले जाते. तुषार वेल्लापली यांनी 2016 मध्ये आपल्या पक्षाची स्थापना केली होती. विधानसभा निवडणुकीतही त्यांनी नशिब आजमावले होते. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. पुढे त्यांनी वायनाड येथून लोकसभा निवडणूक लढवली. त्यातही त्यांना अपयश आले.