MP Shocking: हातात सल्फासच्या गोळ्या, चेहऱ्यावर हास्य; 3 विद्यार्थीनींनी आत्महत्या करण्यापूर्वी शूट केला व्हिडिओ

या तिन्ही मुली बारावीच्या विद्यार्थिनी होत्या. विष प्राशन केल्यानंतर तिन्ही मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दोन मुलींचा मृत्यू झाला. एका मुलीची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

MP Shocking: हातात सल्फासच्या गोळ्या, चेहऱ्यावर हास्य; 3 विद्यार्थीनींनी आत्महत्या करण्यापूर्वी शूट केला व्हिडिओ
Suicide (pic credit: Wikimedia Commons)

MP Shocking: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिहोर (Sehore) येथील तीन मैत्रिणी शाळेतून बंक करून इंदूरला गेल्या आणि तिघांनीही तेथे विष (Poison) प्राशन केले. या तिन्ही मुली बारावीच्या विद्यार्थिनी होत्या. विष प्राशन केल्यानंतर तिन्ही मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दोन मुलींचा मृत्यू झाला. एका मुलीची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. तीन मुलींनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांचा व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तिन्ही मुली हातात डझनभर सल्फासच्या गोळ्या घेऊन जात आहेत. तसेच, यातील एक मुलगी व्हिडिओमध्ये बाय-बाय करताना दिसत आहे. तीन मुली आत्महत्या करण्यापूर्वी हसत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

या तिने मैत्रिणी सिहोर येथील आष्टा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. इंदूरच्या प्रादेशिक उद्यानात या तिघींनी विष प्राशन केले. या तिन्ही मुली शुक्रवारी बसने इंदूरला पोहोचल्या होत्या. तिघींपैकी पायल आणि पूजा यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचवेळी आरतीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा - Ghaziabad Road Rage Case: गाझियाबादमध्ये रोड रेजची आणखी एक घटना, भरधाव मोटारसायकलने धडक दिल्यानंतर पीडित व्यक्तीला बेदम मारहाण)

आष्टा येथील मॉडेल स्कूलमध्ये शिकणाऱ्या तिन मैत्रिणी इंदूरला आल्या. जिथे पायल तिचा मित्र रोहितला भेटायला आली होती. पार्कमध्ये आल्यानंतर पायलने रोहितला भेटायला बोलावले पण रोहित तिला भेटायला आला नाही आणि त्याने घरी परत जा असे सांगितले. यावरून पायल आणि रोहितमध्ये भांडण झाले. भांडणाचा राग येऊन पायलने विष प्राशन केले.

दुसरीकडे, पूजा ही दुसरी मैत्रिण तिच्या कुटुंबातील कलहामुळे नाराज होती. मैत्रिणीला विष प्राशन करताना पाहून तिनेही विष प्राशन केले. आपल्या दोन मैत्रिणींना विष खाताना पाहून आरती घाबरली. आरतीने विचार केला की घरी गेल्यावर काय उत्तर देऊ. या भीतीने आरतीनेही विष प्राशन केले. पूजा आणि पायलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचवेळी आरतीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 29, 2022 02:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).