Uttar Pradesh Elections 2022: योगी आदित्यनाथ यांनी बनवला 'हा' रेकॉर्ड; आजपर्यंत कोणताही मुख्यमंत्री करू शकला नाही 'हा' विक्रम

जे 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेवर येतील.

Yogi Adityanath (PC - PTI )

Uttar Pradesh Elections 2022: उत्तर प्रदेशातील सर्व 403 विधानसभा जागांवर मतमोजणी सुरू असून भारतीय जनता पक्षाला (भाजप) बहुमत मिळाले आहे. यानंतर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पुन्हा एकदा सरकार बनवताना दिसत आहेत. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर इतिहास रचणार असून त्यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद होणार आहे.

कार्यकाळ पूर्ण करून सत्तेवर येणारे पहिले मुख्यमंत्री -

उत्तर प्रदेशात सरकार स्थापन झाल्यानंतर योगी आदित्यनाथ हे पहिले मुख्यमंत्री बनतील. जे 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेवर येतील. उत्तर प्रदेशच्या इतिहासात आजवर असे घडलेले नाही. याआधी यूपीमध्ये अनेक मुख्यमंत्री पुन्हा सत्तेत आले आहेत, परंतु त्यापैकी एकानेही पहिला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही. यामध्ये संपूर्णानंद, चंद्र भानू गुप्ता आणि हेमवती नंदन बहुगुणा यांच्या नावांचा समावेश आहे. (वाचा - Uttar Pradesh Elections Results 2022: प्रियंका गांधी यांनी काम करुनही उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला धक्का, काय असतील कारणे?)

5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून सत्तेत परत -

2017 मध्ये योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा आपल्या पक्षाला सत्ता देणार असून उत्तर प्रदेशच्या इतिहासातील असा विक्रम करणारे ते पहिले मुख्यमंत्री बनतील आणि पुन्हा सत्तेत येतील.

मुलायम सिंह यांच्यानंतर आमदार झाल्यानंतरही राहतील मुख्यमंत्री -

योगी आदित्यनाथ पहिल्यांदाचं निवडणूक लढत आहेत. ते गोरखपूरमधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 2003 नंतर पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री होणार आहे. यापूर्वी 2003 मध्ये मुलायमसिंह यादव आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री बनले होते. यानंतर मायावती, अखिलेश यादव आणि योगी आदित्यनाथ स्वत: विधान परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत पोहोचले होते.