Today Share Market: शेअर बाजारात सेन्सेक्स 383 अंकांनी तर निफ्टी 159 अंकावर झाला बंद
याशिवाय NSE चा मुख्य निर्देशांक 159.05 अंकांच्या किंवा 0.88 टक्क्यांच्या वाढीसह 18,284.45 वर बंद झाला आहे.
दिवसभराच्या व्यवहारानंतर बाजारात (Share Market) चांगली वाढ झाली आहे. BSE चा मुख्य निर्देशांक BSE सेन्सेक्स (Sensex) 383.21 अंकांच्या म्हणजेच 0.63 टक्क्यांच्या वाढीसह 61,350.26 वर बंद झाला आहे. याशिवाय NSE चा मुख्य निर्देशांक 159.05 अंकांच्या किंवा 0.88 टक्क्यांच्या वाढीसह 18,284.45 वर बंद झाला आहे. बँक निफ्टीबद्दल (Nifty) बोलायचे तर, आजच्या व्यवहारा दरम्यान, तो 69.45 अंकांनी किंवा 0.17 टक्क्यांनी वाढला होता, त्यानंतर तो 41,261 च्या पातळीवर बंद झाला. शेअर्समध्ये वाढ सेन्सेक्सच्या टॉप 30 शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर आज टाटा स्टॉक्सच्या (Stocks) शेअर्समध्ये वाढ झाली आहे.
टाटा स्टील 3.9 टक्क्यांच्या वाढीसह 1345 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय टायटनही 3.20 टक्क्यांच्या वाढीसह 2456 च्या पातळीवर बंद झाला आहे. तसेच नेस्ले इंडियाच्या यादीतील टॉप गेनर्स शेअर्स, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, कोटक बँक, रिलायन्स, एशियन पेंट्स, आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, बजाज ऑटो, भारती एअरटेल, एलटी, एचडीएफसी, मारुती, एम अँड एम, एचसीएल. टेक आणि सन फार्माचे समभागही वाढीसह बंद झाले आहेत.
टॉप लूझर शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर इंडसइंड बँकेत आज सर्वात मोठी घसरण झाली आहे. इंडसइंड बँकेचा समभाग 1.92 टक्क्यांनी घसरून 1154 पातळीवर बंद झाला. याशिवाय आयसीआयसीआय बँक, एचयूएल, पॉवर ग्रिड, डॉ रेड्डी, अॅक्सिस बँक, टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि एनटीपीसी यांच्या शेअर्सवरही विक्रीने वर्चस्व राखले आहे. हेही वाचा Western Railway Recruitment 2021: पश्चिम रेल्वे मध्ये नोकरीची संधी; 21 नोव्हेंबर पर्यंत rrc-wr.com वर करा ऑनलाईन अर्ज