Punjab Viral: फोन हिसकावून नेताना तरुणीला 350 मीटरपर्यंत फटफटत नेले (Watch Video)
दिवसेंदिवस फोन चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. पंजाब येथून धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका तरुणीच्या हातातून फोन हिसकावणाऱ्या दोन चोराचा व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे.
Punjab Viral: दिवसेंदिवस फोन चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. पंजाब येथून धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका तरुणीच्या हातातून फोन हिसकावणाऱ्या दोन चोराचा व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे. शनिवारी ही घटना उघडकीस आली. जालंतरधरमधील ही घटना आहे. (हेही वाचा- टीसी ठरला देवदूत! मुंबई-कोल्हापूर रेल्वेखाली येण्यापासून महिला प्रवाशाला वाचवले; पुणे स्थानकावरील घटना (Watch Video)
मिळालेल्या माहितीनुसार, जालंधर येथील रस्त्यावरून जात असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या दोघांन्ही तरुणींचा फोन हिसकावला. तरुणीने फोन वाचवण्याचा अथक प्रयत्न केला. तरुणी फोन वाचवण्याच्या प्रयत्नात होती. अखेर तीला चोरट्यांनी फरफटत नेले. तरीही देखील तरुणी फोन वाचवू शकली नाही. चोरट्यांनी तिला रस्त्याच्या कडेला सुमारे ३५० मीटर पर्यंत खेचून नेले. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
जालंधर में बच्ची का मोबाइल लूटा। बच्ची रोड पर घिसटती रही, ताकि मोबाइल बचा सके, लेकिन नहीं बचा पाई। कहती है ग़रीब पिता ने दिलाया था, पढ़ाई करती थी। अब क्या करूँगी।
रोंगटे खड़े करने वाला वीडियो और खबर देखिए।#Jalandhar #Crime #police #AAP
@DGPPunjabPolice pic.twitter.com/RnBIL57kzB
— Baldev Krishan Sharma (@baldevksharma) September 8, 2024
या घटनेत तीला दुखापत झाली आणि तिचे कपडेही फाटले. नागरिकांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी चोरट्यांवर संताप व्यक्त केला. दोन दिवसांपूर्वीच लाडोवली रोडवर फोन स्नॅच प्रकरण घडले. मुलगी महाविद्यालयातून घरी परतत असतानाच चोरट्यांनी तिच्याकडून फोन हिसकावून घेतला. या दोन्ही घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
(The above story first appeared on LatestLY on Sep 09, 2024 12:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

