Post Office National Savings Certificate Scheme: राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र पोस्ट ऑफिस योजनेत केवळ 5 वर्षात मिळणार 21 लाख रुपये; 100 रुपयांपासून सुरू करू शकता गुंतवणूक

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र 100, 500 रुपये, 1000 रुपये, 5000 आणि 10,000 रुपयांच्या गुंतवणूक पर्यायामध्ये उपलब्ध आहे. या योजनेत तुम्ही किमान 100 रुपयांची गुंतवणूक करू शकता.

Post Office (PC-Wikimedia Commons)

Post Office National Savings Certificate Scheme: कोरोना महामारीमुळे सर्वांच्याच आर्थिक परिस्थिती मोठा बदल झाला आहे. त्यामुळे याकाळात अगदी छोटी गुंतवणूक तुमच्यासाठी भविष्यात मोठी मदत ठरू शकते. तुम्ही आपल्या कमाईतून काही पैशांची बचत करून ती सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. सरकारच्या असंख्य योजना आहेत, ज्यामध्ये तुम्ही कमी गुंवणुकीवर चांगला नफा मिळू शकतो. यातील एक पर्याय म्हणजेचं पोस्टातील राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेचे फायदे -

या योजनेत आपण केवळ अल्प प्रमाणात गुंतवणूक करू शकता आणि काही वर्षांत आपण मोठ्या प्रमाणात पैसे मिळवू शकता. पोस्ट ऑफिसमधील आपले पैसे पूर्णपणे सुरक्षित असल्याने, अशा परिस्थितीत आपण कोणत्याही जोखीमशिवाय येथे गुंतवणूक करू शकता. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेची मुदत 5 वर्षे आहे. विशेष म्हणजे आकस्मिक गरजांसाठी काही अटींसह आपण 1 वर्षाच्या मॅच्युरिटी कालावधीनंतरही आपली योजना रक्कम काढू शकता. आर्थिक वर्षाच्या प्रत्येक तिमाहीच्या सुरूवातीस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याज दर सरकार ठरवते.

आपण या योजनेत 100 रुपयांनी गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेंतर्गत दरवर्षी 6.8 टक्के व्याज दिले जाते. विशेष म्हणजे या योजनेत आयकर कलम 80Cसी अंतर्गत तुम्हाला वर्षाकाठी दीड लाख रुपयांची कर सूट देखील मिळू शकते. (वाचा - Aadhaar Card Update: तुमच्या फोनमधून 10 मिनिटांत अपडेट करता येईल आधार कार्ड, जाणून घ्या प्रोसेस)

इतक्या रुपयांपासून सुरू करू शकता गुंतवणूक -

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र 100, 500 रुपये, 1000 रुपये, 5000 आणि 10,000 रुपयांच्या गुंतवणूक पर्यायामध्ये उपलब्ध आहे. या योजनेत तुम्ही किमान 100 रुपयांची गुंतवणूक करू शकता. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणूकीलाही मर्यादा नाही.

5 वर्षात 21 लाख रुपये कसे मिळतील?

पाच वर्षात 21 लाख रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीस भरमसाठ पैसेही द्यावे लागणार आहेत. जर तुम्ही सुरुवातीला 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.8 टक्के व्याज मिळेल. म्हणजेच पाच वर्षानंतर तुम्हाला 20.85 लाख रुपये मिळतील. त्यात तुमची स्वतःची गुंतवणूक 15 लाख रुपये असेल, परंतु तुम्हाला व्याजाच्या स्वरूपात सुमारे 6 लाख रुपये मिळतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now