IPL Auction 2025 Live

Ramdas Athawale Statement: पंतप्रधान मोदींविरोधात जितके पक्ष एकत्र येतील तितका त्यांना फायदा होईल, केंद्रीय मंत्री आठवलेंनी केले वक्तव्य

2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, अशी मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Ramdas Athawale | (Photo Credits-Facebook)

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि इतर पक्ष (Party) यांबाबत एक वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जितके नेते आणि पक्ष एकत्र येतील तितका त्यांना फायदा होईल.  2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, अशी मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारच्या (Modi government) विरोधात 19 विरोधी पक्षांच्या संयुक्त बैठकीला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सर्व विरोधक पंतप्रधान मोदींच्या विरोधात एकत्र आले, त्यांनाच फायदा होईल. विरोधी पक्षांना कोणताही फायदा होणार नाही. कारण विरोधी पक्षांकडे पंतप्रधानपदाचे अनेक दावेदार आहेत. जर पंतप्रधानपदासाठी कोणी एका नावावर सहमत नसेल, तर एकता अयशस्वी होईल.

2024 च्या निवडणुकीत फक्त नरेंद्र मोदी जिंकतील आणि ते पंतप्रधान होतील. एनडीए (NDA) एकत्रितपणे सरकार बनवेल. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. असे केंद्रीय राज्यमंत्री म्हणालेआहेत. महाराष्ट्रातील जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील खटल्याला उत्तर देताना आठवले म्हणाले, नारायण राणे यांना मोदी सरकारमध्ये मोठे पद मिळाले आहे. त्यांच्या जन आर्शिवाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करणे ही चांगली गोष्ट नाही.  हेही वाचा Afghan National With Nagpur Connection: नागपूरात बेकायदेशीर पणे राहणार्‍या अफगाणी व्यक्तीला मायदेशी पाठवल्यानंतर आता त्याचे हाती रायफलचे फोटो वायरल; नागपूर पोलिसांनी 'या' प्रकरणी दिली अशी प्रतिक्रिया

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही अफगाणिस्तान प्रकरणावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की तालिबान ही एक दहशतवादी संघटना आहे. 20 वर्षांपासून अफगाणिस्तानवर कब्जा करायचा होता. आता त्याने जाऊन गुंडगिरीचा ताबा घेतला आहे. तालिबानने सत्ता काबीज केली आहे. अफगाणिस्तानचे लोक एक दिवस बंड करून तालिबान्यांना हाकलून लावतील. असे वक्तव्य त्यांनी केले आहे.