Delhi Murder Case: पतीला आधी पाजली दारू, नंतर प्रियकराच्या मदतीने गळा दाबून केली हत्या, दोघांना अटक

त्यांचे कुटुंबीय दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी राहतात.

Murder | (Photo Credits: PixaBay)

पतीच्या हत्येप्रकरणी (Murder) दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) पूर्व जिल्ह्यातील मंडवली पोलिस स्टेशनने (Mandavali Police Station) मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक (Arrested) केली आहे. तर, मंडवली पोलीस ठाण्याला 4 डिसेंबर रोजी रुग्णालयातून माहिती मिळाली होती की, सुरेश नावाच्या व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी मृताच्या कुटुंबीयांना जबाब घेण्यास सांगितले, मात्र मृत सुरेशच्या पत्नीने तिची प्रकृती ठीक नसल्याचे सांगत जाणूनबुजून नकार दिला. त्यांचे कुटुंबीय दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी राहतात.

7 डिसेंबर रोजी मृत सुरेशचे शवविच्छेदन करून मृताचा मृतदेह पत्नी हेमा व भाऊ दीपक यांच्या ताब्यात देण्यात आला. शवविच्छेदनादरम्यान, पत्नी आणि मुलासह कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवले गेले, ज्यामध्ये मृताच्या मृत्यूवर कोणीही संशय व्यक्त केला नाही. परंतु शवविच्छेदन अहवालात मृताच्या डोक्यावर, मानेवर, छातीवर आणि पोटावर बाह्य तसेच अंतर्गत जखमा आढळून आल्याने पोलिसांनी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला. हेही वाचा Karnataka Shocker: कौटुंबिक वादातून निर्दयी आईने दोन लहान मुलींना जाळले, महिला अटकेत 

तपासादरम्यान या प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी पत्नी, मुले आणि कुटुंबातील इतर सदस्य तसेच शेजाऱ्यांची चौकशी केली, परंतु कोणताही सुगावा लागला नाही. बऱ्याच प्रयत्नांनंतर मृताच्या पत्नीच्या जबानीत काही विरोधाभास आढळून आले. दुसऱ्या तपासादरम्यान, मुलगा निशांत आणि मृताला रुग्णालयात आणणाऱ्या शेजाऱ्याने मृताची पत्नी आणि तिचा प्रियकर हे आरोपी असू शकतात, असे सूचित केले.

सतत चौकशी केल्यानंतर मृताची पत्नी हेमा आणि तिचा प्रियकर सचिन यांनी गुन्ह्याची कबुली दिली. हेमाने सचिनसोबत गेल्या 2 वर्षांपासून संबंध असल्याची कबुली दिली. दोघांनाही एकत्र राहायचे होते, यासाठी त्यांनी मिळून सुरेशला संपवण्याची योजना आखली. घटनेच्या दिवशी हेमा आणि तिच्या प्रियकराने सुरेशला दारू पाजायला लावली. काही वेळाने सुरेश नशेत आल्यावर दोघांनी पडद्याने आणि चुनीने त्याचा गळा आवळून खून केला. आरोपी हेमा आणि सचिन या दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.