IPL Auction 2025 Live

Patna: बिहारमधील डॉक्टरला दारूचा मोह आवरला नाही, झाली तुरूंगात रवानगी

गार्डनीबागचे स्टेशन हाऊस ऑफिसर अरुण कुमार यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज्यात दारूबंदी असतानाही दारूचे सेवन करणारे असे सर्व लोक आमच्या रडारखाली आहेत.

Arrested

बिहारमधील पाटणा (Patna) येथील राहत्या घरी दारू (Alcohol) प्यायल्याने राज्यव्यापी दारूबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी एका डॉक्टरला अटक (Arrest) करण्यात आली. त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अभिषेक मुंडू असे या डॉक्टरचे नाव असून तो झारखंडमधील (Jharkhand) जमशेदपूर (Jamshedpur) येथील रुग्णालयात काम करत असल्याचा दावा केला होता. गार्डनीबागचे स्टेशन हाऊस ऑफिसर अरुण कुमार यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज्यात दारूबंदी असतानाही दारूचे सेवन करणारे असे सर्व लोक आमच्या रडारखाली आहेत. आम्ही त्यांच्यावर नियमित कारवाई करतो. आम्हाला एक माहिती मिळाली.

चर्चच्या आवारात अभिषेक मुंडू नावाचा एक डॉक्टर मद्यप्राशन करत आहे. घटनास्थळी पोहोचल्यावर त्याच्या ताब्यातून दारूची बाटली जप्त करण्यात आली.  आम्ही त्याची तपासणी केली तेव्हा त्याने दारू प्यायल्याचे सिद्ध झाले. त्याने सांगितले की तो झारखंडच्या जमशेदपूर येथील ईएसआय हॉस्पिटलमध्ये तैनात आहे आणि नाताळच्या सुट्टीत येथे आला होता. त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे, कुमार पुढे म्हणाले. हेही वाचा GGI 2021: गृहमंत्री अमित शहा यांनी जारी केला 'गुड गव्हर्नन्स इंडेक्स 2021'; सुशासनाच्या बाबतील गुजरात पहिल्या, तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

त्याने दारूचा पुरवठा कुठून केला याचा तपास करत आहोत, असे त्यांनी सांगितले. 26 नोव्हेंबर रोजी बिहार पोलिस कर्मचार्‍यांनी राज्यातील दारूबंदीची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी शपथ घेतली होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नोव्हेंबरमध्ये दावा केला होता की, दारूबंदीनंतर राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले आहे.