IPL Auction 2025 Live

Karnataka: भाजप आमदाराच्या मुलीने BMW चालवताना सिग्नल तोडला, पोलिसांनी कारवाई करताच हुज्जत घालत म्हणाली 'खबरदार! मी आहे आमदार कन्या'

यादरम्यान तिने सिग्रलकडे दुर्लक्ष केले आणि ट्रॅफिक सिग्नल तोडून पुढे निघाली. यानंतर तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तिला रोखले आणि दंड ठोठावण्याबाबत सांगितले.

Photo Credit - Social Media

कर्नाटकातील (Karnataka) भाजप आमदार (BJP MLA) अरविंद निंबावली (Arvind Limbavali) यांच्या मुलीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ती पोलिसांशी हुज्जत घालताना दिसत आहे. ट्रॅफिक सिग्नल तोडल्याबद्दल पोलिसांनी तिला थांबवले, त्यानंतर आमदाराच्या मुलीने धाक दाखवत रस्त्यावर भयंकर तमाशा करायला सुरुवात केली. मात्र, पोलीस कर्मचार्‍यांनी मुलीला 10 हजारांचा दंड ठोठावून सर्व विडंबन दूर केले. हे प्रकरण बंगळुरूमधील राजभवनाजवळ असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आमदार अरविंद निंबावली यांची मुलगी बीएमडब्ल्यू कारमधून तिच्या मित्रांसोबत कुठेतरी जात होती. यादरम्यान तिने सिग्रलकडे दुर्लक्ष केले आणि ट्रॅफिक सिग्नल तोडून पुढे निघाली. यानंतर तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तिला रोखले आणि दंड ठोठावण्याबाबत सांगितले.

Tweet

पोलिसांनी थांबवल्यानंतर तरुणी बाहेर पडली आणि रस्त्यात ती पोलिसांशी हुज्जत घालताना दिसली. मुलीने स्थानिक पत्रकार आणि कॅमेरा सोबतही गैरवर्तन केल्याचे सांगितले जात आहे. वाद घालताना मुलीने वडील आमदार असल्याचा अभिमानही दाखवला. यादरम्यान राजभवनाकडे जाणारा रस्ताही रोखण्यात आला. (हे देखील वाचा: Patna: पाटणातील गंगा पाथवे येथे दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक, घटना कॅमेऱ्यात कैद)

दंड भरण्यासाठी पैसे नाहीत

मात्र, पोलिसांनी तरुणीच काही न ऐकता तिच्यावर 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यानंतर ती . तरुणी म्हणाली, तिच्याकडे पैसे नाहीत, म्हणून मला जाऊ द्या. पोलिसांनी ते मान्य केले नाही, त्यानंतर कारमध्ये बसलेल्या मित्रांनी तिचा दंड भरला.