Suicide: प्रेमवीरांनी पळून जाऊन लग्नाचा रचला प्लॅन, मात्र प्रियकर पोहोचलाच नाही, तरुणीची आत्महत्या
शिवपुरीच्या संजय कॉलनीत राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीचे कपिल नावाच्या तरुणावर प्रेम होते. दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचाही प्लॅन केला होता. मात्र त्या दिवशी तरुण पोहोचला नाही. तेव्हा तरुणीने एक-दोन दिवस त्याची वाट पाहिली.
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) शिवपुरीमध्ये (Shivpuri) एका तरुणीने प्रेमाच्या हट्टापायी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. शिवपुरीच्या संजय कॉलनीत राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीचे कपिल नावाच्या तरुणावर प्रेम होते. दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचाही प्लॅन केला होता. मात्र त्या दिवशी तरुण पोहोचला नाही. तेव्हा तरुणीने एक-दोन दिवस त्याची वाट पाहिली. तरीही तो तरुण न आल्याने अखेर तिने आत्महत्या केली. मुलीच्या वडिलांनी मृत्यूला प्रियकर कपिल जबाबदार असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, त्यांची मुलगी गेल्या काही दिवसांपासून प्रियकर कपिलची वाट पाहत होती, कारण त्याने लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. मुलगा वेळेवर न पोहोचल्याने तिचा संयम सुटला होता. तिने आत्महत्येचे पाऊल उचलले.
त्यांनी पुढे सांगितले की, जेव्हा त्यांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलीला अनेकवेळा संबंध संपवण्याची विनंती केली. परंतु ती लग्नाच्या आग्रहावर ठाम राहिली. यानंतर त्याने कपिलच्या पालकांना याबद्दल बोलण्यास सांगितले. ते म्हणाले की जेव्हा त्याने कपिलच्या भाऊ आणि वडिलांशी चर्चा केली तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी लग्नास स्पष्टपणे नकार दिला, कारण तो त्यांच्या जातीचा नव्हता. जातीच्या कारणावरून त्यांनी हे लग्न साफ नाकारले होते. हेही वाचा Suicide: पत्नीसोबत होत असलेल्या सततच्या भांडणाला कंटाळून पतीची गळफास घेत आत्महत्या
त्याचवेळी ते म्हणाले, कपिलच्या घरच्यांनी असंही म्हटलं होतं की, जर हे लग्न झालं तर ते सून आणि मुलगा दोघांचीही हत्या करतील. तेव्हापासूनच कपिलने पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं होतं. त्यांच्या मुलीला घ्यायला तो आला नाही. यानंतर मुलीला दुखापत झाली आणि एक-दोन दिवस वाट पाहिल्यानंतर तिचा संयम सुटला. तिने शुक्रवारी आत्महत्या करून जीवन संपवले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Deven Bharti Appointed New Mumbai Police Commissioner: देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, जाणून घ्या कारकीर्द
Dr. Shirish Valsangkar: डॉ. शिरीष वळसंगकरांची म्युच्युअल फंडात मोठी गुंतवणूक; 160 कोटींच्या गुंतवणूकीचे वारसांना 300 कोटी मिळणार
Mumbai Pocso Court: अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 20 वर्षांसाठी सक्तमजुरीची शिक्षा; मुंंबईतील पोक्सो कोर्टाचा निर्णय
Honour Killing In Jalgaon: जळगावमध्ये ऑनर किलिंगची घटना! प्रेमविवाह केल्याने वडिलांकडून मुलीवर गोळीबार, तर जावयालाही जाळण्याचा प्रयत्न
Advertisement
Advertisement
Advertisement