महिलेच्या गायनावर प्रेक्षक इतका झाला प्रसन्न केला चक्क तिच्यावर पैशाचा पाऊस, पाहा व्हिडिओ
तर एका व्यक्तीने चक्क बादली भरुन पाण्यासारखा पैशाचा पाऊस गायिका उर्वशी राददिया यांच्यावर केला.
गुजरात: लावणी नृत्य, गायन अशा क्षेत्रातील कलाकारांना आपल्या गायनकलेमुळे एक दिवस आपल्यावर पैशांचा अक्षरश: पाऊस पडेल, असा विचार ते करत असतील का, याबाबत शंकाच आहे. पण आता एक अशी घटना समोर आली आहे, जिथे एका महिलेच्या गायनावर एक प्रेक्षक इतका प्रसन्न झाला की त्याने चक्क तिच्यावर पैशाचा पाऊस पाडला. 15 नोव्हेंबर 2021 रोजी तुळशी विवाहच्या निमित्ताने गुजराती गायिका 'उर्वशी राददिया' (Urvashi Radadiya) यांच्या गायनाचा कार्यक्रम अहमदाबाद (Ahmedabad) येथे आयोजित करण्यात आला होता. हा गायनाचा कार्यक्रम चालू असतानाच तिथे उपस्थित प्रेक्षकांना त्यांचे गाणे खूपच आवडले व त्यांनी पैशाची उधळण करायला सुरुवात केली. तर एका व्यक्तीने चक्क बादली भरुन पाण्यासारखा पैशाचा पाऊस गायिका उर्वशी राददिया यांच्यावर केला.
उर्वशी यांनी हा व्हिडिओ पोस्ट करीत असे म्हणाल्या, “श्री समस्त हिरावाडी ग्रुपच्या वतीने तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्वांच्या अमूल्य प्रेमाबद्दल मनःपूर्वक आभार.” उर्वशी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसून येत असून इतका दिलदार प्रेक्षकवर्ग कसा असू शकतो हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. (हे ही वाचा Mukesh Khanna on Veer das: वीर दासच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुकेश खन्ना संतापले.)
उर्वशी रदादिया या गुजरातच्या लोकप्रिय लोकसंगीत गायिका आहेत. उर्वशी यांची टॉप गुजराती गायकांमध्ये गणना केली जाते. त्यांना काठीयावाड की 'कुक्कु' या नावाने देखील ओळखले जाते. त्यांनी वयाच्या 6 वर्षापासूनच गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली होती. उर्वशी गुजरातीव्यतिरिक्त हिंदी, पंजाबी, मराठी, राजस्थानी या भाषांतही गाणी गातात. उर्वशीच्या गायनाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.