Shocking! सासूने स्वयंपाक करायला सांगितल्याने संतापलेल्या सुनेने खाल्लं उंदराचं औषध; महिलेची प्रकृती चिंताजनक
मात्र, तिची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी तिला जिल्हा रुग्णालयात रेफर केले. सध्या तिची प्रकृती चिंताजनक आहे.
Shocking! मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात सासू (Mother-in-law) ने स्वयंपाक करायला सांगितल्यामुळे सुनेने (Daughter-in-law) आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण जिल्ह्यातील थाचीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर कॉलनीशी संबंधित आहे. सासूने स्वयंपाक करायला सांगितल्यामुळे सुनेने आत्महत्या करण्यासाठी उंदीर मारण्याचे औषध खाल्ले. हा प्रकार तिच्या पतीला कळताच महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असले तरी महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार भार्गव त्याची पत्नी संजना भार्गव आणि आईसोबत थाचीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेडकर कॉलनीत राहतात. राजकुमार एका किराणा दुकानात काम करतो आणि त्याची आईही कामावर जाते. असे सांगितले जात आहे की, राजकुमारची आई संध्याकाळी कामावरून परतली तेव्हा घरी स्वयंपाक नव्हता. त्यानंतर राजकुमारच्या आईने संजनाला स्वयंपाक करायला सांगितल्यावर ती रागाने भडकली. (हेही वाचा - Vegetable Theft: चोरट्यांनी चक्क भाजी मंडईला टार्गेट करून टोमॅटो, लिंबू आणि सिमला मिरचीवर मारला डल्ला)
यानंतर सासू आणि सून या दोघांमध्ये वाद झाला. या वादातून शुक्रवारी सायंकाळी संजनाने घरात ठेवलेले उंदराचे औषध दह्यात मिसळून खाल्ले. काही वेळाने महिलेची प्रकृती ढासळू लागल्यावर पती राजकुमार याला बोलावण्यात आले.
राजकुमार यांनी प्रथम पत्नीला जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, तिची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी तिला जिल्हा रुग्णालयात रेफर केले. सध्या तिची प्रकृती चिंताजनक आहे. पती राजकुमारने सांगितले की, त्याची पत्नी म्हणते की, मी फक्त तुझ्यासाठीचं जेवण बनवीन आणि आईसाठी तू बाहेरून आणं किंवा तूच बनवं.