Encounter In Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; सुरक्षा दलाकडून 2 दहशतवादी ठार

आव्हान दिल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. काही काळ दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

Encounter प्रतिकात्म प्रतिमा (Photo Credit : ANI)

Encounter In Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) च्या उरी सेक्टर (Uri Sector) मध्ये सुरू असलेल्या घुसखोरीविरोधी कारवाईदरम्यान, सुरक्षा दलांनी (Security Forces) रविवारी दोन दहशतवाद्यांचे (Terrorists) ठार केलं. तसेच त्यांच्याजवळील शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. परिसरात अजूनही कारवाई सुरू आहे. नियंत्रण रेषेवर सुरक्षा दलांनी सीमेपलीकडून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटाला आव्हान दिले होते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी उत्तर काश्मीरमधील उरी सेक्टरमधील गोहलन भागात नियंत्रण रेषेवर लष्कराच्या जवानांना संशयास्पद हालचाली दिसून आल्या. आव्हान दिल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. काही काळ दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, मात्र हा भाग एलओसीच्या जवळ असल्याने त्यांचे मृतदेह तातडीने मिळू शकले नाहीत. (हेही वाचा -Naxalites Encounter: गडचिरोलीत 8 नक्षलवाद्यांचा खात्मा; 800 जवानांकडून ऑपरेशन)

यापूर्वी, उत्तर काश्मीरमधील सोपोरमध्ये 19 जून रोजी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत दोन दहशतवादीही ठार झाले होते. 9 जून रोजी जम्मू-काश्मीरमधील रियासीमध्ये वैष्णोदेवीला यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. चालकाला गोळी लागल्याने बसचे नियंत्रण सुटून ती खोल खड्ड्यात पडली. या दहशतवादी हल्ल्यात 9 भाविक ठार तर 30 हून अधिक जखमी झाले होते.

याशिवाय, दोन दिवसांत जम्मू भागात अनेक दहशतवादी हल्ले झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि सुरक्षेच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी अधिकाऱ्यांना दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल दहशतवादविरोधी कारवाया करत आहेत. गेल्या दोन आठवड्यात वेगवेगळ्या चकमकीत अर्धा डझनहून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत.