FIFA Ban: सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली AIFF ची प्रशासकीय समिती; अंडर-17 विश्वचषक भारतात आयोजित करण्याचे दिले निर्देश
सर्वोच्च न्यायालयाने अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे काम हाताळण्याची जबाबदारी संघटनेच्या सरचिटणीसांकडे दिली आहे.
FIFA Ban: आंतरराष्ट्रीय फुटबॉलची प्रशासकीय संस्था फिफाने (FIFA) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला निलंबित केल्याच्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने एआयएफएफचे व्यवस्थापन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली सीओए रद्द केली. न्यायालयाचे म्हणणे आहे की, ते एआयएफएफचे निलंबन मागे घेण्याचा आणि अंडर-17 फिफा विश्वचषक (Under-17 FIFA World Cup) भारतात आयोजित करण्यासाठी तसेच भारतीय संघांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी FIFA द्वारे आदेश देत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे काम हाताळण्याची जबाबदारी संघटनेच्या सरचिटणीसांकडे दिली आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्यातील विविध तरतुदी कायम ठेवणाऱ्या निकालाविरोधात दाखल केलेल्या पुनर्विलोकन याचिकेची यादी करण्यास सहमती दर्शवली आहे. (हेही वाचा -FTX Crypto Cup 2022: भारताच्या रमेशबाबू प्रग्नानंधाकडून 5 वेळा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन असलेल्या मॅग्नस कार्लसनचा पराभव)
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुका एका आठवड्याने पुढे ढकलल्या आहेत. प्रशासक समितीची नियुक्ती बाहेरील हस्तक्षेप असल्याचे कारण देत फिफाने एआयएफएफचे सदस्यत्व निलंबित केले आहे. यामुळे भारतातील 17 वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन अडचणीत आले आहे. फिफाशी बोलल्यानंतर सरकारने प्रशासक समिती हटवून लवकरात लवकर निवडणुका घेण्याची विनंती न्यायालयाला केली होती. यामुळे एआयएफएफचे निलंबन रद्द होईल.