ओडिशामधील प्रसिद्ध जगन्नाथ पुरी रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर यावर्षी देशातील अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. परंतु, यंदा ओडिशामधील (Odisha) प्रसिद्ध जगन्नाथ पुरी (Jagannath Puri) रथयात्रेला (Rath Yatra) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) परवानगी दिली आहे. या यात्रेला देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भक्त येत असतात. मात्र, यंदा कोरोना संकटामुळे सर्वाच्च न्यायालयाने सुरूवातीला या यात्रेला परवानगी नाकारली होती. परंतु, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या अटींचे पालन करून मंगळवारी ही रथयात्रा पार पडणार आहे. मंदिर समिती, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने ही रथयात्रा पार पडली पाहिजे, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

ओडिशामधील प्रसिद्ध जगन्नाथ पुरी रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
Jagannath Puri Rath Yatra (Photo credits: Twitter/Naveen Jindal)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर यावर्षी देशातील अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. परंतु, यंदा ओडिशामधील (Odisha) प्रसिद्ध जगन्नाथ पुरी (Jagannath Puri) रथयात्रेला (Rath Yatra) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) परवानगी दिली आहे. या यात्रेला देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भक्त येत असतात. मात्र, यंदा कोरोना संकटामुळे सर्वाच्च न्यायालयाने सुरूवातीला या यात्रेला परवानगी नाकारली होती. परंतु, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या अटींचे पालन करून मंगळवारी ही रथयात्रा पार पडणार आहे. मंदिर समिती, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने ही रथयात्रा पार पडली पाहिजे, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रथयात्रेवर स्थगिती आणली होती. या निर्णयानंतर सर्वाच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने जगन्नाथ पुरी यात्रेला परवानगी दिली आहे. पुरी येथील रथ यात्रेचा मोठा इतिहास आहे. 284 वर्षांपासून एकदाही ही यात्रा रद्द करण्यात आलेली नाही. त्यामुळे भाविकांना दिलासा मिळाला आहे. (हेही वाचा - कागदपत्र, फाईल्सच्या माध्यमातून होणारा कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून 'अल्ट्रा वॉइलेट सॅनिटाइजिंग मशीन'ची निर्मिती; पहा व्हिडिओ)

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात जगन्नाथ रथयात्रेला परवानगी नाकारली होती. परंतु, सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी जर आम्ही रथयात्रेला परवानगी दिली तर भगवान जगन्नाथ आम्हाला माफ करणार नाही, असं म्हटलं होतं. मात्र, यासंदर्भात याचिता दाखल करण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाने आज रथयात्रेला परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोरील सुनावणीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारची बाजू मांडली.

यावेळी त्यांनी इतक्या शतकांची परंपरा थांबवली जाऊ शकत नाही. लाखो लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे जर भगवान जगन्नाथ उद्या येऊ शकले नाही, तर परंपरेप्रमाणे पुढील 12 वर्ष ते येऊ शकणार नाहीत, असंही तुषार मेहता यांनी आपली बाजू मांडताना सांगितलं. लोकांची गर्दी टाळून आणि कोरोना चाचणीत निगेटिव्ह आलेल्या पुजाऱ्यांना परवानगी देत जगन्नाथ पुरी रथयात्रा पार पाडली जाऊ शकते, असंही मेहता यांनी यावेळी स्पष्ट केलं.

(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2020 05:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).