Sukesh Chandrasekhar Viral Video: जेलवर छापा पडताच ढसाढसा रडू लागला सुकेश चंद्रशेखर; दीड लाखाच्या चप्पलसह सापडली 80 हजारांची जीन्स, पहा व्हिडिओ

सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये सुकेशच्या सेलमधून छापेमारीत पकडण्यात आलेले चैनीचे सामानही दाखवण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने मंडोली जेल प्रशासनाच्या हवाल्याने हा व्हिडिओ जारी केला आहे.

Sukesh Chandrasekhar Viral Video in Jail (PC - ANI)

Sukesh Chandrasekhar Viral Video: 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या मंडोली कारागृहात बंद असलेल्या ठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar )चा सीसीटीव्ही व्हिडिओ गुरुवारी समोर आला आहे. 2 मिनिटे 253 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये ठग सुकेश चंद्रशेखर ढसाढसा रडताना दिसत आहे. या सोबतच या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये सुकेशच्या सेलमधून छापेमारीत पकडण्यात आलेले चैनीचे सामानही दाखवण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने मंडोली जेल प्रशासनाच्या हवाल्याने हा व्हिडिओ जारी केला आहे.

यासंदर्भात तुरुंग अधिकाऱ्याने सांगितले की, व्हिडिओ लीक करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. सुकेश चंद्रशेखरचे सीसीटीव्ही फुटेज लीक करणाऱ्या व्यक्तीवर तुरुंग प्राधिकरण चौकशी करेल आणि कारवाई करेल. हा व्हिडीओ गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यातील आहे. (हेही वाचा -Tihar Jail DG: सुकेश चंद्रशेखर वादाच्या पार्श्वभूमीवर तिहार तुरुंगाचे डीजी Sandeep Goyal यांची बदली; Sanjay Beniwal यांना मिळाली कमान)

कोण आहे सुकेश चंद्रशेखर?

बंगळुरू येथील रहिवासी असलेल्या सुकेशला वैभवशाली जीवन जगण्याची आवड होती, त्यामुळे त्याने लहान वयातच फसवणूक करण्यास सुरुवात केली. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री यांचा मुलगा एचडी कुमारस्वामी यांचा मित्र असल्याचे दाखवून एक कोटीहून अधिक कुटुंबाची फसवणूक करताना वयाच्या 17 व्या वर्षी बेंगळुरू पोलिसांनी त्याला प्रथम पकडले.

32 वर्षीय सुकेशवर देशभरात 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजधानीतील त्याच्या खोलीतून सुमारे 1.25 कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. EOW ने या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला असून ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्यावरही आरोप आहे.

सुकेश तुरुंगातून खंडणीचे रॅकेट चालवत असल्याची चर्चा असतानाच, तिहार तुरुंगातील 82 अधिकारी आणि कर्मचारी त्याला तुरुंगात सुविधा पुरवत होते, ज्यांना सुकेश महिन्याला दीड कोटी रुपये मानधन देत होता. हे पुरावे गोळा केल्यानंतर उघड झाले. या सर्वांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now