Opportunity to Win 15 Lacs: मोदी सरकार देत ​​आहे 15 लाख रुपये कमवण्याची सुवर्ण संधी, घरबसल्या करावे लागेल 'हे' काम

कोरोना महामारीमुळे देशात बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. तर, अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावा लागत आहे. अशातच मोदी सरकारने घरबसल्या 15 लाख रुपये जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

Opportunity to Win 15 Lacs: मोदी सरकार देत ​​आहे 15 लाख रुपये कमवण्याची सुवर्ण संधी, घरबसल्या करावे लागेल 'हे' काम
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Opportunity to Win 15 Lacs: कोरोना महामारीमुळे देशात बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. तर, अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावा लागत आहे. अशातच मोदी सरकारने घरबसल्या 15 लाख रुपये जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. डिपार्टमेंट ऑफ फाइनॅनशियल सर्व्हिसेस, अर्थमंत्रालयाने लोकांकडून डेव्हलपमेंट फाइनॅनशियल इन्स्टीट्यूशनला( DFI) काय नाव (Name) देता येईल, त्याची टॅगलाइन (Tagline) काय हवी आणि त्याचा लोगो (Logo) कसा हवा? यासंदर्भातील सल्ले मागवले आहेत. 15 ऑगस्टपर्यंत या स्पर्धेसाठी नोंदणी करता येणार आहे. माय जीओव्ही इंडियाने (My Gov India) ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती शेअर केली आहे.

माय जीओव्ही इंडियाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर दिलेल्या माहितीनुसार, डिपार्टमेंट ऑफ फाइनॅनशियल सर्व्हिसेससाठी स्पर्धकांना एक क्रिएटिव्ह नाव, टॅगलाईन आणि एक लोगो बनवण्याची ही स्पर्धा आहे. महत्वाचे म्हणजे, नाव, लोगो आणि टॅगलाइन हे संस्था काय काम करते हे दर्शवणारे हवे किंवा त्याचा कल्पना या गोष्टींमधून यायला हवी अशी अपेक्षा आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रत्येकी पाच लाख रुपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांनाही बक्षीस मिळणार आहे. हे देखील वाचा- NACH: आरबीआयने राष्ट्रीय स्वयंचलित क्लीयरिंग हाऊसचे बदलले नियम, जाणून घ्या कारण

ट्वीट-

यासंदर्भातील अधिक माहितीसाठी https://www.mygov.in/task/name-tagline-and-logo-contest-development-financial-institution/ या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)



Share Us