Sudha Murty Troll: रक्षाबंधन दिवशी एक्स पोस्टमुळे सुधा मूर्तीं ट्रोल; बहिण-भावाच्या नात्याचा थेट मुघलांशी संबंध जोडला

बहिण-भावाच्या नात्याचा हिंदू देवतांशी संबंध जोडायचा सोडून थेट मुघलांशी संबंध का जोडला ? अशा तीव्र प्रतिक्रीया नेटकरी देत आहे.

Photo Credit- X

Sudha Murty Troll: आज सर्वत्र रक्षाबंधन सण साजरा होत आहे. सोशल मीडियापासून सर्वत्रच यासंबंधी शुभेच्छा दिल्या जात आहेत. राज्यसभा सदस्या सुधा मूर्ती(Sudha Murthy) यांनी देखील त्याच्या X अकाउंटवर रक्षाबंधन सणासंबंधी एक पोस्ट केली, ज्यात रक्षाबंधनाच्या उगमाचा संबंध सुधा मूर्ती मुघल सम्राट हुमायूनशी(Humayun) जोडला. त्यामुळे त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांना ट्रोल केले जात आहे. मूर्ती यांच्या या पोस्टमुळे वाद निर्माण झाला असून नेटकरी अत्यंत तिखट प्रतिक्रीया देत आहेत. (हेही वाचा:Raksha Bandhan 2024 Messages for Brother In Marathi: रक्षाबंधन निमित्त Wishes, Images, Quotes, WhatsApp Status द्वारे द्या लाडक्या भावाला खास शुभेच्छा! )

सुधा मुर्ती यांची x पोस्ट

'रक्षाबंधन सणाला समृद्ध इतिहास आहे. जेव्हा राणी कर्णावती संकटात होती तेव्हा तिने राजा हुमायूनला भावंडाचे प्रतीक म्हणून एक धागा पाठवला आणि त्याची मदत मागितली. इथूनच धाग्याची परंपरा सुरू झाली आणि ती आजतागायत सुरू आहे.'

सोशल मीडीयावर टीका

या पोस्टनंतर लोकांकडून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत. मूर्ती यांच्या या दाव्याला “बनावट” म्हणत, एका वापरकर्त्याने मला वाटले तुम्हाला वाचायला आवडते … पण तुम्ही कदाचित काल्पनिक कथा वाचता. तर दुसऱ्या वापरकर्त्याने “असे कधीही झाले नाही, तुमचे ऐतिहासिक ज्ञान सुधारण्यासाठी आठवड्यातून 70 तास वाचा…” असे म्हणत नारायण मूर्ती यांच्या आठवड्याचे 70 तास काम केले पाहिजे या अजब सल्ल्याचा संबंध जोडला आहे.

श्रीकृष्ण द्रौपद रक्षासूत्राची माहिती घ्या 

एका वापरकर्त्याने त्यांना कमेंटमध्ये श्रीकृष्ण द्रौपदीचे रक्षासूत्राची माहिती घ्या असा सल्ला दिला आहे. “या क्षणी मला माहित आहे की तुम्हाला भारतीय सण आणि संस्कृतीबद्दल काहीही माहिती नाही जर तुमचा या निरर्थक कथेवर विश्वास असेल. मुलांसाठी तुमच्या पुस्तकांची शिफारस केल्याबद्दल मला माफ करा. त्यांना ही निर्मित कथा शिकण्याची गरज नाही. कृपया श्रीकृष्णासाठी द्रौपदीचे रक्षासूत्र आणि श्रावण पौर्णिमेचे महत्त्व वाचा,”